Join us

तब्बल 35 लोकेशन्सवर चित्रीत करण्यात आलेला 'बस स्टॉप'

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2017 11:21 IST

मराठी सिनेसृष्टीतील मल्टीस्टार्सना एकत्र आणणारा 'बस स्टॉप'  हा सिनेमा २१ जुलैला प्रदर्शित होत आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ आणि नव्या ...

मराठी सिनेसृष्टीतील मल्टीस्टार्सना एकत्र आणणारा 'बस स्टॉप'  हा सिनेमा २१ जुलैला प्रदर्शित होत आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ आणि नव्या स्टार्सना एकाच फ्रेममध्ये आणण्याचे काम दिग्दर्शक समीर हेमंत जोशी यांनी केले असून अगदी मनोरंजक आणि विनोदी ढंगाने आजच्या तरुण पिढीचे प्रश्न या सिनेमातून मांडण्यात येणार आहेत. याविषयी या चित्रपटाचे दिग्दर्शक समीर जोशी सांगतात, "एक लेखक म्हणून मी सेल्फ एडीट करायचो, मात्र यावेळी मी तसे केले नाही. मला वाटली ती भाषा, ते शब्द प्रसंगानुरूप योग्य वाटतील तसे लिहित गेलो,  ज्या वयातील पात्रांची गोष्ट आहे, ते असंच वागतात, बोलतात. त्यामुळे पात्रात ते गरजेचे होते. तसेच पालकांच्या मनोवृत्तीचेदेखील सादरीकरण करावे लागणार होते. त्यामुळे नव्या आणि जुन्या पिढीचा मेळ असलेली कथा मी लिहिली आहे.या सिनेमाच्या चित्रीकरणामागची मेहनत खूपच जास्त आहे. आम्ही दर दोन दिवसांनी लोकेशन बदलत असू. या चित्रपटात सहा-सात घरे, कॉलेज, कॅण्टीन, रेस्टॉरंट, पब्स, बस स्टॉप, पार्किंग, अपार्टमेंट, गच्ची अशी मिळून जवळपास ३५ लॉकेशन्स आहेत. प्रत्येक पात्राचं घर वेगळं, त्यांचे इंटिरियर वेगळे असल्याने सिनेमाचा दर्जा उंचावला आहे.सोशल नेटवर्किंग साईट ट्विटरवरुन अमृता खानविलकरने या सिनेमाची घोषणा केली होती. या सिनेमात अमृतासह मल्टिस्टार कास्ट असणार आहे. अनिकेत विश्वासराव, हेमंत ढोमे, सिद्धार्थ चांदेकर, पूजा सावंत, रसिका सुनील, अक्षय वाघमारे, मधुरा देशपांडे, सुयोग गोरे, अविनाश नारकर,संजय मोने, शरद पोंक्षे, उदय टिकेकर, विद्याधर जोशी हे प्रमुख भूमिकेत असणार आहेत. तरुणांचे आवडते संगीतकार जसराज, हृषीकेश, सौरभ यांनी या सिनेमाला संगीत दिलंय. राज्य पुरस्कार विजेते अभिजित अब्दे यांच्या कॅमेऱ्यातून या चित्रपटाचे चित्रीकरण करण्यात आले आहे. Also Read : 'बस स्टॉप'वर भेटणार अमृता!