‘बरड’चा ट्रेलर लॉँच
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2016 21:08 IST
सध्या मराठीत विविध विषयांवर नाविण्यपूर्ण चित्रपटांचा ट्रेंड सुरू आहे. तानाजी घाडगे दिग्दर्शित ‘बरड’ हा चित्रपट अशाच वेगळ्या विषयावर येत आहे
‘बरड’चा ट्रेलर लॉँच
सध्या मराठीत विविध विषयांवर नाविण्यपूर्ण चित्रपटांचा ट्रेंड सुरू आहे. तानाजी घाडगे दिग्दर्शित ‘बरड’ हा चित्रपट अशाच वेगळ्या विषयावर येत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच लॉँच झाला असून प्रेक्षकांमध्ये उत्सुकता दिसत आहे. खेड्यातील दाहक वास्तव या चित्रपटात मांडण्यात आले आहे. देवेंद्र कापडणीस लिखीत-निर्मित या चित्रपटात सुहास पळशीकर, राजन पाटील, शहाजी काळे, भारत गणेशपुरे, संजय कुलकर्णी, नंदकिशोर कुलकर्णी आदी कलाकारांच्या या सिनेमात प्रमुख भूमिका आहेत. प्रदर्शनापूर्वीच ‘बरड’ पुणे आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये झळकला. खेड्यातील दाहक वास्तव या चित्रपटात मांडण्यात आले आहे. ग्रामीण भाषेत ज्या जागेला बरड म्हणतात अशा ओसाड माळरानावर अचानक काहीतरी काम सुरू होते, गावकºयांमध्ये तर्क वितकर्ना उत येतो, यात स्वार्थांची पोळी भाजून घेणारे समाजकंटकदेखील असतात. ते गावातील भोळ्याभाबड्यांना हातोहात फसवतात. आपापसात भांडणे सुरू होतात, नाती पणाला लागतात आणि यातूनच एकामागोमाग एक घटनांचा उलगडा होत असतो. वास्तवदर्शी बरड येत्या ३ जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.