Join us

लालबागची राणी'चे निर्माते बोनी कपूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2016 18:42 IST

 मराठी चित्रपटांचे यश पाहता बॉलीवुड कलाकारांसहित, दिग्दर्शक, निर्माते यांची पाउले देखील मराठी इंडस्ट्रीकडे वळू लागली आहेत. या लिस्टमध्ये आता, ...

 मराठी चित्रपटांचे यश पाहता बॉलीवुड कलाकारांसहित, दिग्दर्शक, निर्माते यांची पाउले देखील मराठी इंडस्ट्रीकडे वळू लागली आहेत. या लिस्टमध्ये आता, बॉलीवुडचे मोठे नाव असणारे बोनी कपूर यांचे देखील नाव शामील झाले आहे. बोनी कपूर हे ३ जूनला प्रदर्शित होणारा लालबागची राणी या चित्रपटाचे निर्माते आहेत. हा चित्रपट लक्ष्मण उतेकर यांनी दिग्दर्शन केला आहे. बोनी कपूर निर्माते कसे? हा प्रश्न  प्रेक्षकांना नक्कीच पडला असेल? पण या प्रश्नाचा उलगडा लक्ष्मण उतेकर यांनी लोकमत लोकमत सीएनएक्सच्या माध्यमातून केला. ते म्हणाले, माझ्या टपाल या प्रिमीयर वेळी श्रीदेवी व बोनी कपूर उपस्थित होते. त्यावेळी टपाल पाहून ते फार हळवे झाले होते. तसेच श्रीदेवींसह बोनी कपूर  यांना देखील अश्रू आवरणे शक्य झाले नाही. पण बोनी कपूर यांनी त्यावेळी अनेक शुभेच्छा तर दिल्याच पण त्यांच्यासोबत पुढे काम करण्याची इच्छाही व्यक्त केली. आणि ही इच्छा लालबागची राणी या चित्रपटाने पूर्ण केली. त्याचबरोबर माझी देखील त्यांच्यासोबत काम करण्याची इच्छा पूर्ण झाली. मनात सुरु असलेल्या या विषयाबद्दल त्यांना सांगितले आणि बोनी क पूर यांनी क्षणाचाही विलंब न लावता चित्रपटाची कथाही न ऐकता लगेच होकार देखील कळवला. 'तुम्ही आधी कथा तर ऐका' असे म्हणालो असता 'मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. तू जे करशील ते उत्तमच असेल' असा विश्वासदेखील बोनी यांनी बोलून दाखविला. या चित्रपटात वीणा जामकर ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत झळकणार आहे. समाजाला आदर्श घालू पाहणारा हा चित्रपट नक्कीच प्रेक्षकांच्या पसंतीस पडेल असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.