Join us

फुगे आणि ध्यानीमनी चित्रपट आज होणार प्रदर्शित

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2017 11:10 IST

आज फुगे आणि ध्यानीमनी हे दोन चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या दोन चित्रपटांची  चर्चा बºयाच दिवसांपासून रंगत होती. त्याचबरोबर हे ...

आज फुगे आणि ध्यानीमनी हे दोन चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या दोन चित्रपटांची  चर्चा बºयाच दिवसांपासून रंगत होती. त्याचबरोबर हे दोन चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकदेखील उत्सुक होते. आज फायनली प्रेक्षकांची ही उत्सुकता संपणार आहे. विशेष म्हणजे, हे दोन्ही चित्रपट कथा, पटकथा, कलाकार अशा गोष्टींनी ताकदवान आहेत. त्यामुळे प्रेक्षकांना आजचा दिवस हा चित्रपटांच्याबाबतीत खूपच खास असणार आहे.                           स्वप्ना वाघमारे दिग्दर्शित फुगे हा चित्रपट आहे. मित्रांची दुनिया ही न्यारीच असते. धम्माल, मजा-मस्ती, रुसवे-फुगवे आणि वेळ पडली तर एकमेकांसाठी खांद्याला खांदा लावून उभे राहण्याची तयारी असलेले मित्र. मैत्रीच्या आणाभाका घेत एकमेकांसाठी जीव ओवाळून टाकण्याची तयारी असलेले मित्र रियल लाइफमध्ये आपल्या आजूबाजूला असतातच मात्र रिल लाइफमध्येही मैत्रीवर आधारित विविध सिनेमा आले आहेत. शोलेमधील जय वीरु, यारी है इमान मेरा यार मेरा जिंदगी म्हणणारे अमिताभ-प्राण, सलामत रहे दोस्ताना म्हणणारे अमिताभ आणि शत्रुघ्न सिन्हा आणि मराठमोळी दुनियादारी. अशा एक ना अनेक सिनेमांमधून मैत्रीचे विविध पैलू रसिकांनी रुपेरी पडद्यावर अनुभवले आहेत. आता याच मैत्रीवर आधारित फुगे हा सिनेमा आहे.  मैत्रीच्या घनिष्ट नात्यावर आधारित फुगे या सिनेमात पहिल्यांदाच स्वप्नील जोशी आणि सुबोध भावे यांची आॅनस्क्रीन केमिस्ट्री रसिकांना पाहायला मिळणार आहे. तसेच या चित्रपटात प्रेक्षकांना या दोघांसोबत प्रार्थना बेहेरे, नीता शेट्टी असे अनेक कलाकार दिसणार आहे. .या सिनेमाची निर्मिती एस टीव्ही नेटवर्क्ससोबत जीसिम्सचे अर्जुनसिंग बर्हान, कार्तिक निशानदार तसेच अश्विन आंचन आणि अनुराधा जोशी यांनी केली असून इंदर राज कपूर या सिनेमाचे प्रस्तुतकर्ते आहेत.                        चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित ध्यानीमनी हा चित्रपट आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून अभिनेता महेश मांजरेकर आणि आश्विनी भावे पहिल्यांदा एकत्रित येत आहे.  या दोन दिग्गज कलाकारांसोबत प्रेक्षकांना अभिनेता अभिजीत खांडकेकर आणि मृण्मयी देशपांडे पाहायला मिळणार आहे. मानसिक जीवनातील रहस्य उलगडणारा हा चित्रपट आहे. त्यामुळे या चित्रपटाचीदेखील प्रेक्षकांना अधिक उत्सुकता आहे. महेश मांजरेकर, मेधा मांजरेकर आणि अनिरुद्ध देशपांडे यांच्या ग्रेट मराठा एंटरटेन्मेंटनं या चित्रपटाची निर्मिती केली आहे. तसेच स्मिता ठाकरे, अमोलख सिंग गाखल, इक्बालसिंग गाखल आणि राजेश बंगा सहनिमार्ते आहेत. तसेच नाटककार प्रशांत दळवी यांनीच चित्रपटाचं लेखन केलं आहे. संदीप खरे यांनी गीतलेखन आणि अजित परब यांनी संगीत दिग्दर्शन केलं आहे. त्यामुळे हे दोन्ही चित्रपटदेखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल हे नक्की.