Join us
Daily Top 2Weekly Top 5

​तेजस्वी पाटीलने केला लूक चेंज

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2017 10:33 IST

तेजस्वी पाटीलने अगडबम या चित्रपटाद्वारे तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर तिने अनेक मालिकांमध्ये काम केले. पण सावर रे या ...

तेजस्वी पाटीलने अगडबम या चित्रपटाद्वारे तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर तिने अनेक मालिकांमध्ये काम केले. पण सावर रे या मालिकेमुळे तिला खऱ्या अर्थाने ओळख मिळाली. अघोर, प्रेमाचा झोलझाल, एक अलबेला यांसारख्या चित्रपटांमध्ये देखील तिने काम केले आहे. एक अलबेला या चित्रपटातील तिच्या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते.तेजस्वी सध्या प्रेक्षकांना एका नव्या लूकमध्ये पाहायला मिळत आहे आणि तिच्या या लूकची चांगलीच चर्चा आहे. तेजस्वीने तिच्या या नव्या लूकचा फोटो नुकताच सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या लूकमध्ये ती खूपच छान दिसत आहे.तेजस्वीने फेसबुकला तिचा फोटो पोस्ट केल्यापासून या फोटोला अनेक लाइक्स मिळाल्या असून अनेक जण त्यावर कमेंट्स करत आहेत. या कमेंट्सवरून तिचा हा नवा लूक तिच्या चाहत्यांना खूप आवडला असल्याचे आपल्याला दिसून येत आहे. तेजस्वीने हा लूक तिच्या नव्या चित्रपटासाठी केला आहे का याची उत्सुकतादेखील तिच्या फॅन्सना लागली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून तिला अनेकजण याबाबत विचारतदेखील आहेत. या नव्या लूकविषयी तेजस्वी सांगते, "तोच तोच लूक पाहून आपल्याला सगळ्यांनाच कंटाळा येतो. त्यामुळे आपला लूक बदलूया असे कित्येक दिवसांपासून माझ्या डोक्यात सुरू होते आणि त्यामुळे मी मस्त हेअर कट केला. माझे केस नेहमीच खांद्यापर्यंत असतात. पण यावेळी मी थोडेसे जास्त केस कापल्याने माझा पूर्ण लूकच बदलला आहे आणि हा लूक माझ्या फॅन्सना खूप आवडत आहे. हा लूक मी कोणत्याही चित्रपटासाठी नव्हे तर सहजच केला आहे."