Join us
Daily Top 2Weekly Top 5

हे दोघे झाले टॉम अ‍ॅन्ड जेरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2016 15:16 IST

            टॉम अ‍ॅन्ड जेरी यांची झक्कास जोडी सर्वांनाच पाहायला आवडते. लहान मुलांचे तर सर्वात जास्त आवडते कार्टुन कोणते असेल ...

            टॉम अ‍ॅन्ड जेरी यांची झक्कास जोडी सर्वांनाच पाहायला आवडते. लहान मुलांचे तर सर्वात जास्त आवडते कार्टुन कोणते असेल तर ते टॉम अ‍ॅन्ड जेरी. आता या जोडीला पुन्हा एकदा दोन मराठी कलाकार नव्याने घेऊन येणार आहेत. मृण्मयी देशपांडे आणि ललित प्रभाकर ही फ्रेश जोडी बनणार आहे टॉम अ‍ॅन्ड जेरी. तुम्हाला वाटेल की कोणत्या मालिकेत किंवा चित्रपटात हे दोघे टॉम अ‍ॅन्ड जेरी बनणार का. तर तसे बिलकुलच नाहीये, ही जोडी टॉम अ‍ॅन्ड जेरीला घेऊन येणार आहे ते रंगंभूमीवर. टॉम अ‍ॅन्ड जेरी हे जुने नाटक पुन्हा एकदा रंगभूमी गाजविण्यास सज्ज झाले आहे. महेश मांजरेकर ललित आणि मृण्मयीच्या नवीन जोडीसह या नाटकाला रंगमंचावर घेऊन येणार आहेत. जुन्या नाटकामध्ये निखिल रत्नपारखी व कादंबरी कदम ही जोडी होती. तर आता नव्या नाटकात निखिल रत्नपारखी आपल्याला लेखक व दिग्दर्शक अशा दोन्ही भूमिकांमध्ये दिसणार आहेत. ललित आणि मृण्मयीची ही हटके जोडी आता नाट्यरसिकांना किती आवडते हे तर आपल्याला नाटक रंगमंचावर आल्यावरच समजेल.