Join us
Daily Top 2Weekly Top 5

सुनिधी चौहानने गायलं मराठी सिनेमातील ‘मन हे गुंतले’ गाणं, प्रेक्षकांकडून मिळतोय भरभरून प्रतिसाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2023 15:07 IST

सुनिधी चौहान हिच्या आवाजतलं ‘छापा काटा’ चित्रपटातील ‘मन हे गुंतले’ गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या गाण्याला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत असून हे गाणं प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. 

बॉलिवूड गायिका सुनिधी चौहान तिच्या सुमधूर आवाजाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करते. अलिकडेच तिच्या आवाजातील "आटा पिटा" हे मराठमोळं गाणं प्रदर्शित झालं होतं. या गाण्याने महाराष्ट्रात धुरळा उडवला होता. आता सुनिधी चौहान हिच्या आवाजतलं ‘छापा काटा’ चित्रपटातील ‘मन हे गुंतले’ गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या गाण्याला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत असून हे गाणं प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. 

सुनिधी चौहान यांनी गायलेलं ‘मन हे गुंतले’ हे गाणं २९ नोव्हेंबरला सर्वत्र प्रदर्शित झालं. गौरव चाटी यांनी या गाण्याचे संगीत दिग्दर्शन केलं आहे. तर शिवम बरपंडे यांनी हे गाणं लिहिलं आहे. सुनिधी चौहानने गायलेल्या या गाण्याबद्दल अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रा.लिमिटेडचे सी.ई.ओ. श्री. सुशीलकुमार अग्रवाल म्हणाले, “संगीत म्हटलं की मन अगदी उल्हासित होऊन जातं. महाराष्ट्रातल्या प्रत्येक रसिकाच्या मनाला उल्हासित करण्यासाठी सुनिधि चौहान हिच्या सुरेल आवाजातलं गाणं सादर करत असताना आमचा आनंद गगनात न मावणारा आहे.”

‘छापा काटा’ चित्रपटाची निर्मिती श्री.सुशीलकुमार अग्रवाल यांनी केली असून संदीप मनोहर नवरे यांनी दिग्दर्शन केले आहे. चित्रपटात मकरंद अनासपूरे आणि तेजस्विनी लोणारी प्रमुख भूमिकेत दिसणार असून मोहन जोशी, अरुण नलावडे, ऋतुराज फडके, पंकज विष्णु, सुश्रृत मंकणी, रीना अग्रवाल आणि विजय पाटकर हे सुप्रसिद्ध अभिनेते झळकणार आहेत.

टॅग्स :सुनिधी चौहानमराठी चित्रपटमराठी अभिनेता