Join us

बॉलीवुड चली रे..........

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2016 16:14 IST

मराठीत सिनेमात यशाचा झेंडा रोवल्यानंतर बॉलीवुडचे दरवाजे अनेकांसाठी उघडतात.. मराठीतून हिंदी सिनेमात एंट्री मारलेल्या कलाकारांची भली मोठी लिस्ट आहे.. ...

मराठीत सिनेमात यशाचा झेंडा रोवल्यानंतर बॉलीवुडचे दरवाजे अनेकांसाठी उघडतात.. मराठीतून हिंदी सिनेमात एंट्री मारलेल्या कलाकारांची भली मोठी लिस्ट आहे.. आता आणखी एका मराठमोळ्या अभिनेत्रीसाठी बॉलीवुडचे दरवाजे उघडले आहेत.. ही अभिनेत्री म्हणजे प्रार्थना बेहरे.. प्रार्थना लवकरच वजह तुम हो या सिनेमातून बी-टाऊनमध्ये एंट्री मारतेय.. पहिल्याच सिनेमात तिला अभिनेता शर्मन जोशीसह काम करण्याची संधी मिळणार आहे.. 'हेट स्टोरी २' तसेच 'हेट स्टोरी ३' यासारखे हिट सिनेमे देणारे विशाल पांड्या यांच्या आगामी 'वजह तुम हो' या हिंदी सिनेमात प्रार्थना प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. टी सिरीजची निर्मिती असणाऱ्या या सिनेमाचे चित्रीकरण येत्या जूनपासून सुरु होणार आहे. प्रार्थनानं आधी पवित्र रिश्ता मालिकेतून छोटा पडदा गाजवला.. त्यानंतर 'जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा' या मराठी सिनेमातून एंट्री मारत रसिकांची मनं जिंकली.. यानंतर 'मितवा', 'कॉफी आणि बरंच काही', 'मिस्टर एंड मिसेस सदाचारी' या सिनेमातून तिच्या अभिनयाची झलक पाहायला मिळाली.. याचमुळं तिच्यावर पुरस्कारांचाही वर्षाव झाला.. आता थेट बॉलीवुडमध्ये संधी मिळाल्यानं प्रार्थनाची अवस्था आज मैं ऊपर आसमाँ नीचे अशीच काहीशी झाली असणार..