Join us
Daily Top 2Weekly Top 5

'वॉचमॅन, ड्रायव्हरनेही मला ओळखलं होतं'; प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचा न्यूड व्हिडीओ झाला होता लीक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2023 12:11 IST

या अभिनेत्रीने ‘पॅड मॅन’, ‘विक्रम वेधा’ यांसारख्या गाजलेल्या सिनेमांमध्ये काम केलं आहे.

 गेल्या काही काळात कलाविश्वाच्या कक्षा रुंदावल्या आहेत. त्यामुळे बऱ्याच सिनेमा, वेबसीरिजमध्ये कथेची गरज म्हणून बोल्ड सीन, किसिंग सीन यांसारखे दृश्य दाखवली जातात. यासाठी कलाकार मंडळीदेखील तयार होतात. परंतु, यात अनेकदा अभिनेत्रींना ट्रोलिंगचाही सामना करावा लागतो. इतकंच नाही तर अभिनेत्रींचे बोल्ड सीन व्हायरलदेखील केले जातात. ज्यामुळे अभिनेत्रींना नाहक मनस्तापाला सामोरं जावं लागतं. यात सध्या अशाच एका मराठमोळ्या अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे. या अभिनेत्रीचा एक न्यूड व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ज्यामुळे तिला घरातून बाहेर पडणंही कठीण झालं होतं.

प्रसिद्ध अभिनेत्री राधिका आपटे साऱ्यांनाच ठावूक आहे. मराठीसह हॉलिवूडपर्यंत राधिकाने मजल मारली आहे. याच राधिकाचा एक व्हिडीओ लीक झाला होता. ज्यामुळे तिला प्रचंड त्रास सहन करावा लागला. एका मुलाखतीमध्ये तिने या घटनेवर भाष्य केलं आहे."क्लीन शेव या सिनेमाच्या शुटिंग दरम्यान माझा एक न्यूड व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यावेळी मला प्रचंड वाईट पद्धतीने ट्रोल करण्यात आलं होतं. चार दिवस मी माझ्या घराबाहेर सुद्धा येऊ शकत नव्हते. कारण, ड्रायव्हर, वॉचमॅन या सगळ्यांनी मला ओळखलं होतं", असं राधिका म्हणाली.

पुढे ती म्हणते,  "तो एक वादग्रस्त व्हिडीओ होता आणि त्यामध्ये मी नाहीये हे फक्त एखाद्या समजदार व्यक्तीच समजू शकतो.  मला असं वाटत नाही की हे कोणी करु शकेल किंवा कोणी केलं पाहिजे. परंतु, त्याकडे दुर्लक्ष करणंच योग्य आहे. नाही तर आपण उद्धवस्त होऊ. म्हणूनच, जेव्हा पार्च्ड सिनेमासाठी मी कपडे उतरवले त्यावेळी मला असं वाटलं माझ्याकडे आता लपवण्यासारखं काहीच नाहीये."

दरम्यान,  राधिकाने अनेक गाजलेल्या सिनेमांमध्ये काम केलं आहे. राधिका तिच्या बोल्ड अभिनयासह बोल्ड विचारांमुळेही चर्चेत येत असते. तिने आतापर्यंत  ‘मिसेस अंडरकव्हर’, ‘बदलापूर’, ‘कबाली’, ‘पॅड मॅन’, ‘विक्रम वेधा’, ‘बाझार’, ‘फोबिया’, ‘शोर इन द सीटी’, ‘रात एकेली हैं’ अशा कितीतरी गाजलेल्या सिनेमांमध्ये काम केलं आहे. 

टॅग्स :राधिका आपटेसेलिब्रिटीसिनेमाबॉलिवूड