बॅक टू बॅक प्रोजेक्ट्स आणि दर्जेदार भूमिका साकारणारी अभिनेत्री सई ताम्हणकर (Saie Tamhankar) सध्या बॉलिवूड गाजवताना दिसते आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'अग्नी'(Agni Movie)मधून पुन्हा एकदा सईने तिच्या अभिनयाची छाप पाडत आहे. २०२४ मध्ये दमदार काम करणारी आणि कमालीच्या भूमिका साकारणारी सई पुन्हा एकदा प्रेक्षकांना मोहित करून गेली आहे.
२०२४ हे वर्ष सई ताम्हणकरसाठी अनेक गोष्टींसाठी खास ठरले आहे आणि यात तिच्या वैविध्यपूर्ण भूमिका तर होत्याच पण सोबतीने अनेक आव्हाने पेलले आहे. यावर्षात तिने बॉलिवूडमध्ये स्वतःच्या अभिनयाची जादू दाखवली आहे. मिमी, भक्षक आणि आता अग्नी, सईच्या वेगळ्या धाटणीच्या भूमिका या कायम लक्षवेधी ठरतात.
अग्नीमधील रुख्मिणी प्रेक्षकांना भावली आहे. यात तिने बॉलिवूडमधल्या बड्या कलाकारांच्या सोबतीने तिची भूमिका चोख पार पाडली आहे. एक गृहिणी असलेली रुख्मिणी खंबीर पाठिंबा देणारी बायको, बहीण आणि आई आहे हे तिने यातून सिद्ध केलं आहे. सईच्या भूमिकेचे सर्वत्र कौतुक होत असताना बॉलिवूडकरांच्या सोबतीने मराठी कलाकारांनी देखील तिच्या भूमिकेच कौतुक केले आहे. दिग्गज दिग्दर्शक हंसल मेहता पासून नवाजुद्दिन सिद्दीकी, नोरा फतेह ते मराठीमधल्या अनेक कलाकारांनी अग्नीची प्रशंसा केली आहे.
वर्कफ्रंटसई ताम्हणकर शेवटची मानवत मर्डर्स या सीरिजमध्ये पाहायला मिळाली. यात तिने समंद्रीची भूमिका साकारली होती. या वेबसीरिजमध्ये ती नॉन ग्लॅमरस अंदाजात पाहायला मिळाली. या सीरिजला आणि सईच्या पात्राला प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळाले. आगामी काळात सई अनेक बॉलिवूड प्रोजेक्ट्समध्ये दिसणार आहे. यात ग्राउंड झिरो, डब्बा कार्टेल या प्रोजेक्ट्सचा समावेश आहे.