Join us

बॉडीगार्डच्या घेºयात आर्ची

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2016 13:21 IST

             सैराट या सिनेमाने अक्षरश: रातोरात स्टार झालेले आर्ची अन परशा यांचे फक्त भारतातच ...

             सैराट या सिनेमाने अक्षरश: रातोरात स्टार झालेले आर्ची अन परशा यांचे फक्त भारतातच नाही तर आता जगभरात चाहते निर्माण झाले आहेत. आर्चीच्या डॅशिंग अंदाजाचे कौतुक तर सगळ््यांनीच केले आहे. तिची डायलॉगबाजी अन सिनेमातील अस्सल गावरान ठसकेबाज अभिनयाचे सगळेच दिवाने झाले आहेत. आर्चीची एक झलक पाहण्यासाठी लोक अक्षरश: वेडे झालेत. असे असताना रिकुला कुठे वाहेर पडणे देखील  मुश्कील झाले आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यावर या दोघांची क्रेझ ऐवढी वाढली की त्यांना सगळीकडुनच कार्यक्रमांची आमंत्रणे येत आहेत. एखाद्या इवेंटला रिंकु येणार असे समजताच लाखोंच्या गर्दीने आपल्या आर्चीला पाहण्यासाठी लोक तुडुंब गर्दी करीत आहेत. एवढेच नाही तर रिंकु सांगते की मला पाणीपुरी खुप आवडते. एखाद्या ठीकाणी जात असताना मधेच पाणीपुरीची गाडी दिसली तरी मला गाडीतून उतरुन पाणीपुरी खाता येत नाही. कारण लोक लगेच माझ्या भोवती गर्दी करतील अशी भीती असते. मग मला कोणीतरी पाणीपुरी गाडीतच आणुन देते. अशाप्रकारे लोकांच्या गर्दीला घाबरलेल्या रिंकुला सध्या बॉडीगार्ड्सच्या घेºयात रहावे लागत आहेत. अन हे बॉडीगार्ड फक्त एक किंवा दोन नाहीत तर चक्क बारा बॉडीगार्डच्या ताफ्यात रिंकु कुठेही जाण्यास निघते. ही पहिलीच अशी अभिनेत्री असेल जी अगदी रुबाबात बॉडीगार्डच्या मध्ये चालते. ते काहीही असो पण महाराष्ट्रासाठी ही खरच अभिमानास्पद गोष्ट आहे.