Join us
Daily Top 2Weekly Top 5

Birthday Special: जितकी सुंदर तितकीच बेधडक स्वभावाची आहे तेजस्विनी पंडित, तिची आईदेखील आहे प्रसिद्ध अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2021 08:00 IST

तेजस्विनीने अल्पावधीतच सिनेसृष्टीत आघाडीचे स्थान मिळवले आहे. तिचे सुरुवातीचे शिक्षण पुण्यातच झाले.

अभिनेत्री तेजस्विनी पंडित तिच्या बिनधास्त स्वभावासाठी ओळखली जाते. तेजस्विनी वेळोवेळी ट्रोलर्सना रोकठोक उत्तर देत असते. सहजसुंदर अभिनय, घायाळ करणारं सौंदर्य आणि अदा तसंच लक्षवेधी स्टाईल यामुळे तेजस्विनी पंडीतने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यास सुरुवात केली. तेजस्विनी आज आपला 35 वा वाढदिवस साजरा करतेय. वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया तिच्या बद्दलच्या काही खास गोष्टी. 

तेजस्विनीचा जन्म 23 मे 1986 रोजी पुण्यात तिचा जन्म झाला. तेजस्विनीने अल्पावधीतच सिनेसृष्टीत आघाडीचे स्थान मिळवले आहे. तिचे सुरुवातीचे शिक्षण पुण्यातच झाले. व्हॉलीबॉल आणि बास्केटबॉलची ती चाहती आहे. तेजस्विनीने  काही वर्षांपूर्वी ‘अगं बाई अरेच्चा’ या केदार शिंदेच्या चित्रपटाद्वारे तिच्या करियरला सुरुवात केली होती.

तेजस्विनीची आई ज्योती चांदेकर या मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री असून त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये, नाटकांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत.आईच्या पावलावर पाऊल ठेवत तेजस्विनीने देखील सिनेसृष्टीत पदार्पण केले. 

मी सिंधुताई सपकाळ, तू ही रे असे सिनेमा, विविध नाटकं आणि १०० डेज सारख्या मालिकेतून आपल्या अभिनयाने रसिकांची मनं जिंकणारी अभिनेत्री म्हणजे तेजस्विनी पंडित. वैविध्यपूर्ण भूमिकांमुळे रसिकांसह तेजस्विनी दिग्दर्शक आणि निर्मात्यांचीही लाडकी अभिनेत्री बनली आहे. सिनेमा, रंगभूमी आणि छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.

टॅग्स :तेजस्विनी पंडित