Join us
Daily Top 2Weekly Top 5

Birthday Special: पल्लवी सुभाष या मराठी अभिनेत्यासोबत होती रिलेशनशीपमध्ये, अचानक झाले ब्रेकअप

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2020 11:27 IST

पल्लवी आणि या मराठी अभिनेत्याचे अफेअर एकेकाळी चांगलेच गाजले होते.

अभिनेत्री पल्लवी सुभाष आज म्हणजेच ९ जूनला 33 वा वाढदिवस साजरा करत आहे. पल्लवीने अनेक मराठी, हिंदी चित्रपट, नाटक आणि मालिकांमध्ये तसेच जाहिरातींमध्ये काम करून प्रेक्षकांच्या मनात आपली छाप उमटविली आहे. पल्लवीने नेहमीच दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. पल्लवी आणि अभिनेता अनिकेत विश्वासरावचे अफेअर एकेकाळी चांगलेच गाजले होते. बरेच वर्ष ते रिलेशनशीपमध्ये होते. मात्र त्यानंतर ते विभक्त झाले.पल्लवी व अनिकेत दोघे जवळजवळ आठ वर्षं नात्यात होते. पण काही वर्षांपूर्वी त्यांनी ब्रेकअप केले. याविषयी टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना पल्लवीने सांगितले होते की, आम्ही दोघे वेगळे झालो आहोत हे खरे आहे. आम्ही दोघांनी मिळून हा निर्णय घेतला. ही आमची खाजगी बाब असल्याने आमच्या ब्रेकअपचे कारण काय आहे हे मी सांगू इच्छित नाही.

तिने पुढे सांगितले की, एखादी गोष्ट तुमच्यासाठी चांगली आहे असे तुम्हाला वाटत असते. पण काही वर्षांनंतर ती गोष्ट तुमच्यासाठी योग्य नाही याची तुम्हाला जाणीव होते. ब्रेकअप हे कधीच सोपे नसते. त्यामुळे मी माझ्या आयुष्यातील अतिशय वाईट परिस्थितीतून जात आहे. पण माझ्या कामामुळे मला या सगळ्या गोष्टींचा विचार करायला देखील वेळ मिळत नाहीये. आम्ही दोघेही मॅच्युअर्ड असून दोघांचे चांगले व्हावे असाच नेहमी विचार करतो. त्यामुळे एकमेकांशी न बोलण्याचा काही प्रश्नच उद्भवत नाही. आम्ही दोघे एकमेकांचे नेहमीच फ्रेंड्स राहाणार आहोत.

त्यानंतर अनिकेत विश्वासरावने अभिनेत्री स्नेहा चव्हाणसोबत लग्न केले. मात्र पल्लवी आजही सिंगल आहे.

पल्लवीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर 'चक्रवर्ती अशोक सम्राट' या मालिकेमध्ये पल्लवीने साकारलेल्या भूमिकेचे प्रचंड कौतुक झाले होते. त्याचप्रमाणे 'गोद भराई', 'बसेरा', 'आठवा वचन', 'तुम्हारी दिशा' यांसारख्या अनेक मालिकांमध्ये देखील तिने खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. पल्लवीने साऊथ चित्रपटसृष्टीत देखील काम केले असून तेलुगू भाषेतील एका सिनेमातही ती झळकली आहे.

आयुषमान खुरानाचा 'विकी डोनर' हा चित्रपट चांगलाच गाजला होता. याच चित्रपटाच्या तेलुगू रिमेकमध्ये पल्लवीने प्रमुख भूमिका साकारली होती.

टॅग्स :पल्लवी सुभाषअनिकेत विश्वासराव