Join us

सतीश राजवाडेचा आज वाढदिवस

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2017 13:45 IST

  मराठी चित्रपटसृष्टीला दिग्दर्शक सतीश राजवाडे यांनी अनेक सुपरहीट चित्रपट दिले आहेत. अशा या यशस्वी दिग्दर्शकाचा आज वाढदिवस आहे. मराठी ...

  मराठी चित्रपटसृष्टीला दिग्दर्शक सतीश राजवाडे यांनी अनेक सुपरहीट चित्रपट दिले आहेत. अशा या यशस्वी दिग्दर्शकाचा आज वाढदिवस आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी सोशलमीडियाच्या माध्यमातून सतीश राजवाडे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. सतीश याने अनेक सुपरहीट चित्रपटांबरोबरच मालिकेंचेदेखील दिग्दर्शन केले आहे. चित्रपटाप्रमाणेच सतीशच्या मालिकांनी ही प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. त्याचा काही मालिका आजही प्रेक्षक विसरू शकले नाहीत. सतीश राजवाडे याने आपल्या करियरची सुरूवात मुळात अभिनयाने केली होती. त्याचबरोबर त्याने आपल्या अभिनयाची चुणूक रंगभूमीवरदेखील दाखविली होती. या अभिनयानंतर त्याने मालिका आणि चित्रपट दिग्दर्शित केले. त्याच्या या दिग्दर्शनाच्या यशानंतर त्याने मागे वळूनच पाहिले नाही. मग त्याने दिग्दर्शनावरचं लक्ष केंद्रित करण्याचे ठरविले. असंभव, अग्निहोत्र, गुंतता हृदय हे, एका लग्नाची दुसरी गोष्ट अशा या त्यांच्या मालिका प्रचंड गाजल्या आहेत. त्याचबरोबर मुंबई -पुणे मुंबई, मुंबई -पुणे मुंबई २, मृगजळ, एक डाव धोबीपछाड, गैर, प्रेमाची गोष्ट, पोपट, सांगतो ऐका असे अनेक सुपरहीट चित्रपट त्याने मराठी चित्रपटसृष्टीला दिले आहेत. सतीश राजवाडेचा नुकताच ती सध्या काय करते हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे. त्याच्या या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांचा लाडका कलाकार लक्ष्मीकांत बेर्डे यांचा मुलगा अभिनय बेर्डे याने पदापर्ण केले आहे. त्याचबरोबर आपल्या आवाजाने प्रेक्षकांचे मन जिंकरणारी गायिका हीदेखील अभिनय क्षेत्रात उतरली आहे. या दोघांसोबत अंकुश चौधरी आणि तेजश्री प्रधानदेखील या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे.