Join us

​जन्मरहस्य : सायको थ्रीलर नाटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2016 09:22 IST

मराठी रंगभूमीला गौरवशाली इतिहास लाभलेला आहे. संगीत नाटकांपासून आजच्या आधुनिक नाटकांपर्यंत सर्वच विषयांना नाट्यलेखकांनी हात घातलेला आहे.सध्या प्रेक्षकांना ...

मराठी रंगभूमीला गौरवशाली इतिहास लाभलेला आहे. संगीत नाटकांपासून आजच्या आधुनिक नाटकांपर्यंत सर्वच विषयांना नाट्यलेखकांनी हात घातलेला आहे.सध्या प्रेक्षकांना भुरळ घातलेले नाटक म्हणजे ‘जन्मरहस्य’. कुमार सोहोनीं दिग्दर्शित हे सायको थ्रीलर नाटक त्याच्या हटके विषयामुळे प्रेक्षकांनी उचलून धरले आहे.प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांनी हे नाटक लिहिले आहे. अभिनेत्री आणि निर्माती भाग्यश्री देसाई यांनी त्यांच्या ‘रसिकमोहिनी’ बॅनर अंतर्गत प्रेझेंट केले आहे. त्यांनी आतापर्यंत ‘होतं असं कधी कधी’ ही फिल्म आणि ‘लेकुरे उदंड झाली’, ‘टिटवाळा फास्ट’, ‘चिरंजीवी आईस’ आणि ‘चेहरे मुखवटे’ यांसारख्या नाटकांची निर्मिती केली आहे.नाटकात ‘स्नेहल’ नावाच्या प्रमुख भूमिकेत भाग्यश्री आहे. त्या म्हणतात, नाटकाची कथा वाचून मी फारच प्रभावित झाले होते. हा विषय जास्तीत प्रेक्षकांपर्यंत पोहचावा म्हणून मी नाटकाला प्रेझेंट करण्याचा निर्णय घेतला. माझे कॅरेक्टर जीवनात काही चांगल्या तर काही वाईट अनुभवांना सामोरे जाते.यामध्ये तिच्यासोबत अमिता खोपकर, वसुधा देशपांडे, गुरुराज अवधानी आणि अजिंक्य दाते यांच्यादेखील महत्त्वाच्या भूमिका आहेत.Photo Source : MMW