Bigg Boss Marathi : राजेश शृंगारपुरे अन् रेशम टिपणीसच्या परिवाराचे पाहा फोटो!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2018 14:55 IST
‘बिग बॉस मराठी’ या रिअॅलिटी शोमध्ये निर्माण झालेल्या प्रेमसंबंधांमुळे चर्चेत आलेल्या राजेश शृंगारपुरे आणि रेशम सेठ टिपणीस यांच्या परिवाराचे फोटो सध्या सर्वत्र व्हायरल होताना दिसत आहेत.
Bigg Boss Marathi : राजेश शृंगारपुरे अन् रेशम टिपणीसच्या परिवाराचे पाहा फोटो!
‘बिग बॉस मराठी’ या रिअॅलिटी शोमध्ये निर्माण झालेल्या प्रेमसंबंधांमुळे चर्चेत आलेल्या राजेश शृंगारपुरे आणि रेशम सेठ टिपणीस यांच्या परिवाराचे फोटो सध्या सर्वत्र व्हायरल होताना दिसत आहेत. गोरेगाव येथे राहणाºया राजेश शृंगारपुरेच्या लग्नाला बरीच वर्षे झाली असून, त्याला दोन मुली आहेत. राजेशची पत्नी गृहिणी असून, ती लाइमलाइटपासून दूर राहणे पसंत करते. राजेशने मराठीबरोबरच हिंदी चित्रपटांमध्येही आपल्या अभिनयाची चुणूक दाखविली आहे. एक दमदार अभिनेता म्हणून त्याच्याकडे बघितले जाते. बिग बॉस मराठी या रिअॅलिटी शोमध्ये सहभागी झाल्यापासून तो चांगलाच लाइमलाइटमध्ये आला आहे. रेशम टिपणीसचा घटस्फोट झाला असून, तिला मुलगा आणि मुलगी आहे. रेशमचे लग्न अभिनेता संजीव सेठसोबत १९९३ ला झाले होते. पुढे त्यांचा घटस्फोट झाला. घटस्फोटानंतर रेशमची दोन्ही मुले संजीव सेठ यांच्याकडे राहतात. संजीवने रेशमसोबत घटस्फोट घेतल्यानंतर अभिनेत्री लता सब्रवालसोबत लग्न केले. सध्या रेशम आणि राजेश घरातील त्यांच्या आक्षेपार्ह वर्तनामुळे टीकेचे धनी ठरत आहेत. नाशिकमध्ये विधिचे शिक्षण घेणाºया एका विद्यार्थ्यांने त्यांच्या या आक्षेपार्ह वर्तनाच्या चौकशीची मागणी केली आहे.