मराठीतला लोकप्रिय शो 'बिग बॉस मराठी ६' अखेर सुरू झाला आहे. पाच सीझन गाजवल्यानंतर सहावा सीझन ११ जानेवारीपासून प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. 'बिग बॉस मराठी ६' चे होस्टिंग महाराष्टाराचा लाडका भाऊ रितेश देशमुख करत आहे. दरवर्षी काही ना काही तरी वेगळं करण्याचा या शोच्या टीमचा प्रयत्न असतो. रील स्टार्स, कलाकार, इन्फ्लुएन्सर, डान्सर्स अशी मंडळी या सीझनमध्ये आली आहे. प्रत्येकाचा वेगळा अंदाज पाहायला मिळत आहे. आता प्रेक्षकांना वाइल्ड कार्ड म्हणून कोण एन्ट्री घेणार याबद्दल उत्सुकता लागली आहे.
'बिग बॉस मराठी ६' सुरू होण्यापूर्वी ज्येष्ठ अभिनेते जयवंत वाडकर यांच्या नावाची जोरदार चर्चा होती, मात्र प्रत्यक्षात त्यांनी या शोमध्ये सहभाग घेतला नाही. त्यानंतर आता ते 'वाइल्ड कार्ड' स्पर्धक म्हणून एन्ट्री घेणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. आता या चर्चांवर जयवंत वाडकर यांची लेक स्वामिनी वाडकर हिनं इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत या सर्व अफवा असल्याचं स्पष्ट केलं आहे.
स्वामिनी वाडकर सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. तिने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिले, "माझे वडील 'बिग बॉस मराठी'मध्ये येत नाहीयेत, वाइल्ड कार्ड स्पर्धक म्हणूनही नाही. चाहत्यांनी त्यांच्यावर दाखवलेल्या प्रेमाबद्दल खूप धन्यवाद".
स्वामिनीने पुढे चाहत्यांना एक आनंदाची बातमीही दिली. तिने सांगितले की, जयवंत वाडकर सध्या काही नवीन आणि विशेष प्रोजेक्ट्समध्ये व्यस्त असून लवकरच ते प्रेक्षकांच्या भेटीला येतील. "त्यांच्या या आगामी नवीन प्रोजेक्टसाठी तुम्ही तितकेच उत्सुक असाल, अशी आशा आहे", असेही तिने नमूद केले.
Web Summary : Rumors of Jaywant Wadkar's Bigg Boss Marathi entry are false, his daughter clarified. He is working on new projects and will be back soon.
Web Summary : जयवंत वाडकर के 'बिग बॉस मराठी' में प्रवेश की अफवाहें झूठी हैं, बेटी ने स्पष्ट किया। वह नई परियोजनाओं पर काम कर रहे हैं और जल्द ही वापस आएंगे।