Join us

अखेर भूषणने बाल्ड लूक मागचं सांगितले सीक्रेट, सोशल मीडियावर केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2019 07:15 IST

सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या फॅन्ससह शेअर करत असतात. काही दिवसांपूर्वी भूषण प्रधानने एक व्हिडीओ शेअर केला होता.

सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या फॅन्ससह शेअर करत असतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून थेट फॅन्सशी संवाद साधता येत असल्याने दिवसेंदिवस अधिकाधिक सेलिब्रिटी इथं रुळल्याचं आपल्याला पाहायला मिळते. या माध्यमातून रसिकांच्या प्रतिक्रिया थेट जाणून घेता येत असल्याने सेलिब्रेटी सोशल मीडियाला प्राधान्य देत आहेत. अशाच सेलिब्रिटींपैकी एक म्हणजे अभिनेता भूषण प्रधान.

 काही दिवसांपूर्वी त्याने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात त्याचे टक्कल करत असल्याचे पहायला मिळते होते. या प्रश्नाचे उत्तर अखेर मिळाले आहे. भूषण लवकरच झी  ५ अॅपच्या गोंद्या आला रे वेबसिरीजमध्ये झळकणार आहे. यात तो दमोदर हरी चापेकरांची भूमिका साकारणार असल्याचा खुलासा त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केला आहे. 15 ऑगस्टला ही वेबसिरीज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

सतरंगी रे', 'मिस मॅच', 'टाईमपास', 'टाईमपास-2', 'कॉफी आणि बरंच काही' अशा विविध सिनेमांमध्ये भूषणनं भूमिका साकारल्या आहेत. या सिनेमांमध्ये त्याने साकारलेल्या भूमिका रसिकांच्या पसंतीस पात्र ठरल्या होत्या. पिंजरा या मालिकेमुळे त्याला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. मराठीत मिळालेल्या यशानंतर भूषण आता बॉलिवूडकडे वळला आहे. तो सिमी जोसेफ यांच्या चित्रपटातून हिंदी सिनेसृष्टीत एन्ट्री करणार आहे. त्याने याबाबत काही दिवसांपूर्वीच मीडियाशी बोलताना सांगितले होते. या चित्रपटात तो अभिनेत्री रायमा सेनसोबत प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.  

टॅग्स :भुषण प्रधान