Join us

​भाऊ कदम झळकणार एका वेगळ्या भूमिकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2017 17:19 IST

यम आणि चित्रगुप्त यांची कथा आपण अनेक वर्षांपासून ऐकत आहोत. यांच्या कथेवर आधारित बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपट आले आहेत आणि ...

यम आणि चित्रगुप्त यांची कथा आपण अनेक वर्षांपासून ऐकत आहोत. यांच्या कथेवर आधारित बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपट आले आहेत आणि त्यातील अनेक चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाईदेखील केली आहे. तकदीरवाला या चित्रपटात प्रेक्षकांना यम आणि चित्रगुप्त पाहायला मिळाले होेते. चिरंजीवी, रिमा लागू आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांची प्रमुख भूमिका असलेल्या चित्रपटाची त्यावेळी चांगलीच चर्चा झाली होती. यम आणि चंद्रगुप्त यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना चांगलीच भावली होती. काही दिवसांपूर्वी यम है हम ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस आली होती. या मालिकेत मानव गोहिलने यमची तर अतुल परचुरेने चित्रगुप्तची भूमिका साकारली होती. त्यांची जोडी प्रचंड गाजली होती आणि आता यम आणि चित्रगुप्त यांच्यावर एक मराठी चित्रपट येत असल्याचे कळतेय. यम आणि चित्रगुप्त हे पृथ्वीतलावर येतात असे या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. हा एक कॉमेडी चित्रपट असून या चित्रपटाची स्टारकास्ट खूपच चांगली आहे. या चित्रपटात भाऊ कदम एका प्रमुख भूमिकेत झळकणार असल्याचे कळतेय. भाऊ कदम सध्या मराठी इंडस्ट्रीतील एक मोठे नाव आहे. त्याच्या कॉमिक टायमिंगचे सगळेच कौतुक करतात. टाइमपास या चित्रपटातील त्याच्या अभिनयातून त्याने तो एक चांगला विनोदी अभिनेता असल्याचे सिद्ध केले आहे. चला हवा येऊ द्या या कार्यक्रमाद्वारे तर तो प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करतो. त्याच्या प्रत्येक स्किटला प्रेक्षक खळखळून हसतात. आता भाऊ प्रेक्षकांना एका वेगळ्या रूपात पाहायला मिळणार आहे. तो एका चित्रपटात चित्रगुप्तची व्यक्तिरेखा साकारणार असल्याचे कळतेय.