Join us

भारती सिंग म्हणते सिध्दू फाडून टाक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2016 16:21 IST

आपल्या विनोदी शैलीने प्रेक्षकांना खळखळून हसायला लावणारा सिध्दार्थ जाधव याच्या गेला उडत या नाटकची चर्चा सध्या फार जोर धरू लागली आहे. या चर्चेचे उधाण हिंदी इंडस्ट्रीमध्ये देखील वाहत आहे. हिंदी विनोदी मालिकेतून भल्या भल्या स्टारना पोट धरून हसायला लावणारी भारती सिंगने देखील गेला उडत या नाटकाचे कौतुक देखील केले आहे.

आपल्या विनोदी शैलीने प्रेक्षकांना खळखळून  हसायला लावणारा सिध्दार्थ जाधव याच्या गेला उडत या नाटकची चर्चा सध्या फार जोर धरू लागली आहे. या चर्चेचे उधाण हिंदी इंडस्ट्रीमध्ये देखील वाहत आहे. हिंदी विनोदी मालिकेतून भल्या भल्या स्टारना पोट धरून हसायला लावणारी भारती सिंगने देखील गेला उडत या नाटकाचे कौतुक देखील केले आहे. भारती सिंग आणि सिध्दार्थ जाधव कॉमेडी नाइट बचाव या हिंदी विनोदी मालिकेत एकत्र अभिनय करतात. त्यामुळे आपल्या दोस्तीच्या नात्याने भारतीला देखील सिध्दूच्या नाटकाचे पब्लिसिटी करण्याचा मोह आवारला नाही. तिने सोशलमिडीयावर एक व्हिडीओ अपलोड केला आहे. त्या व्हिडीओमध्ये भारती म्हणाली, माझा भाऊ, दोस्त सिध्दार्थ जाधव याचे नवीन नाटक गेला उडत हे सर्वानी पाहा व त्याला भरूभरून आशिर्वाद दया असे आवाहन देखील तिने केले आहे. त्याचबरोबर सिध्दूला शुभेच्छा देत ती म्हणाली, सिध्दार्थ आपल्या अभिनयाने फाडून टाक.}}}}