नेहमी सोज्वळ रूपात प्रेक्षकांना मालिका आणि चित्रपटात दिसणारी भार्गवी चिरमुले आता एकदमच हटक्या रूपात समोर आली आहे. नूकतेच भार्गवीने तिचे काही फोटो सोशल मिडीयावर अपलोड केले आहेत. हे फोटो पाहून तिच्या चाहत्यांना एका नव्या रूपातील भार्गवी पाहायला मिळतेय. सतत एकाच प्रकारच्या भूमिका करून त्या रोल मध्ये अडकण्यापेक्षा आपणही वेगळे दिसु शकतो आणि कोणत्याही भूमिका आपण सहज करू शकतो, यासाठीच भार्गवीने ह मॉडर्न फोटोशूट केले आहे. या नव्या लुकविषयी सीएनएक्सशी बोलताना भार्गवी म्हणते, मला काहीतरी हटके ट्राय करायचे होते. आपणही मॉर्डन लुकमध्ये छान दिसू शकतो असे मला वाटले. आणि एक अभिनेत्री म्हणून एकाच पठडीतील भूमिकांमध्ये मला अडकून रहायचे नव्हते. कलाकार म्हणून सतत काही बदल करणे आवश्यक असते. याआधी माझ्या चाहत्यांनी मला नेहमीच साडीमध्ये किंवा पारंपारिक कपडयांमध्येच पाहिले होते. म्हणूनच ही योग्य वेळ वाटली आणि हा वेगळा लुक ट्राय करून पाहिला. सगळ्यात महत्त्वाच म्हणजे माझे प्रयत्न यशस्वी झालेत. कारण माझे हे फोटो पाहून मला काही दिग्दर्शकांचे फोनही आलेत. तु या लुकमध्ये खूप छान दिसतेस अशी कॉमप्लिमेंट मला सध्या मिळत असल्याचे भार्गवीने सांगितले. त्यामुळे भविष्यात लकरच भार्गवी आपल्याला बोल्ड भूमिका साकरतांना दिसल्यास आश्चर्य वाटयला नको.
भार्गवीला करायचीय इमेज ब्रेक
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2016 16:35 IST