Join us

भार्गवी चिरमुलेची दुबई सफर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2017 13:58 IST

प्रत्येक व्यक्तीचे एक स्वप्न असते. आपण ही परदेशात जावे. तेथिल पर्यटनाचा आनंद घ्यावा. त्या देशातील संस्कृती जवळून पाहावी. त्याचबरोबर ...

प्रत्येक व्यक्तीचे एक स्वप्न असते. आपण ही परदेशात जावे. तेथिल पर्यटनाचा आनंद घ्यावा. त्या देशातील संस्कृती जवळून पाहावी. त्याचबरोबर त्या देशातील प्रत्येक छोटया छोटया गोष्टीचा आनंद घ्यावा. हा आनंद आपल्या स्मरणात कायम राहावा यासाठी प्रत्येकी व्यक्ती ही झक्कास फोटोसेशन करत असते. आणि या फोटोसेशनच्या आठवणी त्या देशाच्या डायरीमध्ये उतरविते. अशीच एक आठवण अभिनेत्री भार्गवी चिरमुलेने सोशलमीडियावर शेअर केली आहे.              नुकतेच अभिनेत्री भार्गवी चिरमुले हिने दुबईची सफर केली असल्याचे पाहायला मिळत आहे. कारण तिने नुकतेच दुबईच्या वाळवंटातील अरेबी लूकमधील एक झक्कास फोटो सोशलमीडियावर अपलोड केला आहे. त्याचबरोबर ती वाळवंटात ही एकदम कूल अशा लूकमध्ये असल्याचे दिसत आहे. तिच्या या लूकला सोशलमीडियावर भरभरून लाइक्स मिळताना पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर तिच्या चाहत्यांनीदेखील तिच्या सौदर्याचे कौतुक केले आहे.                     भार्गवीने नेहमीच आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. तिने अनेक नाटक, मालिका आणि चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावर आधिराज्य केले आहे. संदूक, इश्कवाला लव्ह, गोळा बेरीज, नवरा माझा भावरा, वन रूम किचन, विश्वविनयाक असे अनेक चित्रपट तिने मराठी चित्रपटसृष्टीला दिले आहेत. त्याचबरोबर वहिनी साहेब, चार दिवस सासूचे, अनुबंध, असंभव, पिंजरा, भाग्यविधाता या मालिकेच्या माध्यमातूनदेखील तिने आपल्या अभिनयाची चुणूक दाखविली आहे. तर एकापेक्षा एक या डान्स रियालिटी शोच्या माध्यमातून आपल्या नृत्यानेदेखील प्रेक्षकांना  प्रेमात पाडले आहे. हिमालयाची सावली, झोपी गेलेला जागा झाला असे नाटकदेखील तिने प्रेक्षकांसमोर सादर केले आहे.