भरत जाधव आणि केदार शिंदे या दोघांनी चित्रपट आणि नाटकांच्या माध्यामातून रसिकांच निखळ मनोरंजन केले आहे. या दोन मित्रांनी रंगभूमी तर गाजवलीच रूपेरी पडदयावरही तितकेच दमदार चित्रपट दिलेत. सही रे सही, श्रीमंत दामोदर पंत, लोच्या झाला रे, पुन्हा सही रे सही, ढॅण्टॅ ढॅन या दमदार नाटकांनंतर आता पुन्हा एका नव्या नाटकासाठी हे दोघे सज्ज झाले आहेत. दिग्दर्शक आणि अभिनेता अशी यांची जबरदस्त जोडी प्रेक्षकांसाठी आता काय नवीन घेऊन येणार याकडे त्यांच्या चाहत्यांचे लक्ष लागले आहे. लवकरच हे दोघे 'सौजन्याची ऐशीतैशी' हे नाटक रंगमंचावर घेऊन येत आहेत. या नाटकात आपल्याला भरत एका वेगळ्या रूपात पाहायला मिळणार आहे. केदार आणि भरतची ही जोडी आता काय कमाल करते हे पाहण्यासाठी आपल्याला थोडी प्रतिक्षा करावी लागणार आहे.
भरत-केदारची पुन्हा जमली जोडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2016 16:42 IST