आपल्या अभिनयाने भरत जाधव यांनी रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलं आहे. चित्रपट, रंगभूमी किंवा छोटा पडदा तिन्ही माध्यमांमध्ये वैविध्यपूर्ण भूमिका साकारत भरत जाधवने आपल्या अभिनय कौशल्यातील अष्टपैलूत्व दाखवलं आहे. मात्र या तिन्ही माध्यमांपैकी रंगभूमीवरच भरत जाधवचं मन अधिक रमलं आहे. सही रे सही, श्रीमंत दामोदर पंत, पुन्हा सही रे सही, ऑल द बेस्ट अशा विविध नाटकांत भूमिका साकारल्या आहेत. रंगभूमीवरील त्यांचा वावर, कॉमेडीचं टायमिंग आणि अभिनयाची ताकद यामुळे नाट्यरसिकांचे लाडके अभिनेते बनले आहेत.
भरत जाधव गाजलेलं 'मोरुची मावशी' हे नाटकाचा खास प्रयोगाचे आयोजन करणार आहेत. दिवंगत अभिनेते विजय चव्हाण यांच्या भूमिकेमुळे हे नाटक रंगभूमीवर अजरामर ठरलं होतं. नाटकातील ‘टांग टिंग टिंगा’ हे गाणे आणि त्यावरील नाच नाटकाचा महत्वाचा भाग होता. रेशमी साडी सहजपणे सावरत चव्हाण घालत असलेला पिंगा आणि कोंबडा कधीही न विसरता येणारा. या नाचासाठी त्यांना वन्समोअर मिळायचाच आणि विजय चव्हाणही वन्समोअर घेऊन त्याच उत्साहाने पुन्हा पिंगा आणि कोंबडा घालायचे. त्यामुळेच या नाटकाचा आगामी प्रयोग हा विजय चव्हाण यांना आदरांजली वाहण्यात येणार आहे.