Join us

भरत जाधवचा मास्टर ब्लास्टर रंगभूमीवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2016 14:48 IST

मराठी इंडस्ट्रीतील कलाकारांची यंदा रंगभूमीकडे जोरदार वाटचाल चालू झालेली दिसत आहे. इंडस्ट्रीमधील नवी कलाकारांसह स्टार कलाकार देखील रंगभूमीकडे आकर्षित ...

मराठी इंडस्ट्रीतील कलाकारांची यंदा रंगभूमीकडे जोरदार वाटचाल चालू झालेली दिसत आहे. इंडस्ट्रीमधील नवी कलाकारांसह स्टार कलाकार देखील रंगभूमीकडे आकर्षित झालेले चित्र पाहायला मिळत आहे. सिद्धार्थ जाधव या स्टार कलाकारानंतर आता, भरत जाधव यांचे देखील मास्टर ब्लास्टर हे नवीन नाटकाचा अक्षय तृतीयाचा  शुभ दिवस साधत मुहुर्त करण्यात आला. 'भद्रकाली प्रॉडक्शन्स' आणि 'भरत जाधव एन्टरटेनमेन्ट' एंटरटेनमेंट निर्मित  मास्तर ब्लास्टर हे नाटक रंगभूमीवर लवकरच पाहायला मिळणार आहे.  तसेच या नाटकाच्या मुहर्तवेळी नाटकाचे निमार्ते प्रसाद कांबळी, लेखक-दिग्दर्शक अद्वैत दादरकर, भरत जाधव, प्रदीप मुळ्ये, शीतल तळपदे, अभय राणे, हर्षद तोंडवळकर, भक्ती देसाई आदि उपस्थित होते. तसेच  केदार शिंदे , सिद्धार्थ जाधव यांच्यासोबत त्यांची गेला उडत नाटकची पूर्ण टीम देखील उपस्थित होती.