Join us

"राजसाहेब ठाकरे असे एकमेव नेते ज्यांनी.."; भरत जाधव यांनी सांगितला खास किस्सा, म्हणाले-

By देवेंद्र जाधव | Updated: April 3, 2025 18:20 IST

मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेते भरत जाधव यांनी राज ठाकरेंच्या मैत्रीचा खास किस्सा सर्वांना सांगितला (raj thackeray, bharat jadhav)

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांची मराठी आणि हिंदी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांशी मैत्री आहे. राज ठाकरेंची केदार शिंदे, भरत जाधव (bharat jadhav) यांच्यासोबत असलेली मैत्री सर्वांच्या परिचयाची आहेच. अनेकदा भरत आणि केदार (kedar shinde) यांच्या नाटकांना राज ठाकरे हजेरी लावत असतात. अशातच एका मुलाखतीत भरत जाधव यांनी राज ठाकरेंचा खास किस्सा सांगितला आहे. राज ठाकरेंनी नाटकाच्या कुतुहलापोटी केलेली खास गोष्ट भरत जाधव यांनी सर्वांना सांगितली.

राज ठाकरेंचा खास किस्सा

मराठी वर्ल्ड एंटरटेनमेंट या यूट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत भरत जाधव  म्हणाले की, "ऑल द बेस्ट नाटकापासून राज ठाकरे ही व्यक्ती माझ्या आयुष्यात खूप जवळची झाली. माझ्या आयुष्यात राजसाहेबांनी खूप हातभार दिलाय मला. बाळासाहेबांकडे असल्यापासून राजसाहेबांचा खूप आशीर्वाद आणि हातभार आहे. सही रे सही बद्दल सांगायचं तर, या एका व्यक्तीने हे नाटक समोरुन पाच वेळा पाहिलंय. याशिवाय मी नाटक मागून कसा करतो, हे त्यांनी विंगेतून पाहिलंय."

"राजसाहेब हा एकमेव नेता आहे, ज्यांनी मागे बसून सर्व सुरक्षा लांब ठेऊन साध्या टीशर्टवर एकटा उभा राहून हे नाटक मागून बघितलं.  मी नक्की कुठुन पळतो, कुठुन येतो, हे त्यांना बघायचं होतं. राजसाहेबांच्या सुरुवातीच्या प्रयोगापासून आशीर्वाद आहे तो आजपर्यंत आहे. राजसाहेब नेता आहेच पण त्याहीपेक्षा एक चांगले मित्र आहेत याचा मला आनंद आहे. मित्र म्हणून ते जेव्हा पाठीवर शाबासकीची थाप मारतात तेव्हा नक्कीच त्याचा मला आनंद होतो."

टॅग्स :भरत जाधवराज ठाकरेकेदार शिंदेमराठी अभिनेतामराठीनाटक