Join us  

सातासमुद्रापारही 'कोंबडी पळाली' घालतंय धुमाकुळ, भरत जाधवने शेअर केलेला व्हिडीओ एकदा पाहाच

By ऑनलाइन लोकमत | Published: March 04, 2021 4:07 PM

'कोंबडी पळाली' या आयटम नंबरचे हिंदी वर्जन 'अग्निपथ' या सिनेमात 'चिकनी चमेली'च्‍या रूपात आले आणि एकच धुमाकुळ घातला होता.

मराठीतील सुपरस्टार असं ज्यांना म्हटलं जातं ते अभिनेते म्हणजे भरत जाधव. आपल्या अभिनयाने भरत जाधव यांनी रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलं आहे. चित्रपट, रंगभूमी किंवा छोटा पडदा या तिन्ही माध्यमांमध्ये भरत जाधव यांनी आपल्या अभिनयाचा डंका वाजवल्याचे पाहायला मिळत आहे. तिन्ही माध्यमांमध्ये वैविध्यपूर्ण भूमिका साकारत भरत जाधव यांनी आपल्या अभिनय कौशल्यातील अष्टपैलूत्व दाखवलं आहे.  जत्रातील कोंबडी पळाली या गाण्याने क्रांती रेडकरला नवी ओळख मिळवून दिली तर भरत जाधवचा हटके अंदाज पाहायला मिळाला.कोंबडी पळाली या गाण्यानं रसिकांना अक्षरक्षा वेड लावलं... आजही पार्टी आणि समारंभ कोंबडी पळाली या गाण्याशिवाय पूर्ण होत नाही. 

फॉरेनरनाही या गाण्याची चांगलीच भुरळ पडल्याचे पाहायला मिळत आहे.  सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. यात फॉरेनरने या गाण्यावर ठेका धरल्याचे पाहायला मिळत आहे.भरत जाधवने हा व्हिडीेओ चाहत्यांसह शेअर केला आहे. व्हिडीओला मजेशीर अशी कॅप्शनही दिली आहे. या गाण्यावर फॉरेनरनेही मजेशीर डान्स केला आहे. सध्या हा व्हिडीओ पाहून भरभरुन लाईक्स देत पसंती देत असल्याचे पाहायला मिळत आहे.

या गाण्याच्या वेडातून बॉलिवूडही अलिप्त राहिले नाही. यापूर्वी अजय-अतुलच्या ‘कोंबडी पळाली’ या गाणाच्या चालीवर ‘चिकनी चमेली’ हे गाणे हिंदीत तुफान गाजले होते.  'कोंबडी पळाली' या आयटम नंबरचे हिंदी वर्जन 'अग्निपथ' या सिनेमात 'चिकनी चमेली'च्‍या रूपात आले आणि एकच धुमाकुळ घातला होता.

'अग्निपथ'चे संगीत मराठीतील आघाडीचे संगीत दिग्‍दर्शक अजय- अतुल यांनी केले होते. अजय- अतुलने याआधी 2006 मध्‍ये 'जत्रा' या मराठी सिनेमाला संगीत दिले होते. या गाण्‍याचे हिंदी वर्जन कॅटरीना कैफवर चित्रीत करण्‍यात आले होते. 'चिकनी चमेली' बनलेल्‍या कॅटरीना कैफने यावर मराठी मुलगी बनून अस्‍सल ठुमके लगावले होते. 'कोंबडी पळाली' या गाण्‍याला आवाज देणा-या वैशाली सामंतनेच 'चिकनी चमेली' हे गाणे गायले होते.

टॅग्स :भरत जाधवक्रांती रेडकर