Join us

भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2025 13:30 IST

रंगभूमीवर मनापासून प्रेम करणाऱ्या भरत जाधव यांची देवावरही श्रद्धा आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांनी श्री कृष्णावर असीम श्रद्धा असल्याचं सांगितलं. 

भरत जाधव म्हणजे मराठी सिनेसृष्टीतील उत्कृष्ट कलाकार आणि उमदा नट. मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या भरत जाधव यांनी मोठ्या कष्टाने सिनेसृष्टीत नाव कमावलं. विविधांगी भूमिका साकारून त्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली. तर सही रे सही, श्रीमंत दामोदर पंत, बकुळा नामदेव घोटाळे, जत्रा, पछाडलेला, खबरदार, फक्त लढ म्हणा, क्षणभर विश्रांती हे त्यांचे गाजलेले सिनेमे आणि नाटक. रंगभूमीवर मनापासून प्रेम करणाऱ्या भरत जाधव यांची देवावरही श्रद्धा आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांनी श्री कृष्णावर असीम श्रद्धा असल्याचं सांगितलं. 

भरत जाधव यांनी नुकतीच लोकशाही या वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीत ते म्हणाले, "माझी कृष्णावर खूप श्रद्धा आहे. माझ्या गळ्यातही श्रीकृष्णाचं लॉकेट आहे. आमच्या घरी कित्येक वर्षांपासून कृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाते. जेव्हा वडील कोल्हापूरहून मुंबईत आले होते. तेव्हा ते सोबत एक कृष्णाचा फोटो घेऊन आले होते. तेव्हापासून आम्ही जन्माष्टमी साजरी करतो. कसं असतं बघा...जेव्हा आम्ही कोल्हापुरात शिफ्ट झालो. तेव्हा कृष्णाचा तोच फोटो आम्ही नवीन बंगल्यात लावला. आजही तोच फोटो आहे. एक सर्कल पूर्ण झालं. बाकी घरात देवघर आहे". 

पुढे ते म्हणाले, "मला जेवढ्या पण भूमिका मिळाल्या. त्या भूमिकांची नावं ही बरीचशी कृष्णाची होती. त्या भूमिका हिटही झाल्या. मला वाटतं हा आशीर्वाद आहे. माझ्या वडिलांची कृष्णावर खूप श्रद्धा होती. माझ्या शेतात मी राधाकृष्णाचं देऊळ बांधलं आहे. घरी कृष्णजन्माष्टमी झाल्यानंतर त्या शेतातल्या मंदिरात दुसऱ्या दिवशी दहिहंडी साजरी केली जाते. आम्ही तिथे जेवण वगैरेदेखील ठेवतो". दरम्यान, भरत जाधव आता थांबायचं नाय या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. गुरुवारी(१ मे) हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे. 

टॅग्स :भरत जाधवमराठी अभिनेता