Join us

भजी तळण्याची मजा काही औरच

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2016 12:23 IST

कलाकार हा सतत बिझी असतो. त्याला स्वत:साठी देखील वेळ नसतो. दिवस रात्र तो त्याच्या बिझी शेडयुल्डमध्ये अडकलेला असतो. त्याला ...

कलाकार हा सतत बिझी असतो. त्याला स्वत:साठी देखील वेळ नसतो. दिवस रात्र तो त्याच्या बिझी शेडयुल्डमध्ये अडकलेला असतो. त्याला फॅमिलीसाठी वेळ देणे ही जमत नसते. पण तरी ही आपल्या या बिझी शेडयुल्डमधून वेळ काढून हे कलाकार आपल्या फॅमिलीला वेळ देऊन आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करत असतात. अभिनेता संतोष जुवेकरने देखील असाच काहीसा प्रयत्न केलेला आहे. संतोषने नुकताच सोशल मीडियावर भजी तळतानाचा एक फोटो अपलोड केला आहे. त्याचबरोबर किती ही बिझी असलो तरी घरी भजी तळण्याची मजा काही औरच असते असे स्टेटसदेखील संतोषने लिहीले आहे. संतोषच्या या प्रयत्नाला चाहत्यांनी सोशल मीडियावर भरभरून लाइक्स दिले आहेत.