Join us

फक्त मलायकाच नाही तर मराठीतील या अभिनेत्रीचेही रेड आऊटफिटमधील फोटो होतायेत व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2019 13:42 IST

मलायकानंतर या मराठी अभिनेत्रीनंही शेअर केला रेड आऊटफिटमधील फोटो

अभिनेत्री भाग्यश्री मोटे सोशल मीडियावर सक्रीय आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती स्वतःचे फोटो आपल्या फॅन्ससह शेअर करत असते. तिचा या फोटोमधील अंदाज कुणालाही घायाळ असाच आहे. रुपेरी पडद्यावर तिचं फारसं दर्शन झालं नसलं तरी आपल्या या फोटोच्या माध्यमातून तिने रसिकांच्या काळजाचा ठाव घेतलाय. नुकतेच तिने इंस्टाग्रामवर बोल्ड फोटो शेअर करत सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

भाग्यश्रीने इंस्टाग्रामवर क्लीवेज दाखवत बोल्ड फोटो शेअर केल्यानंतर आता लाल रंगाच्या गाऊनमधील फोटो शेअर करून सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. तिच्या या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव होतो आहे.

भाग्यश्री मोटेने छोट्या पडद्यावरून थेट 'काय रे रास्कला' या बिग बॅनर सिनेमाद्वारे सिनेसृष्टीत पदार्पण केले. यानंतर ती 'माझ्या बायकोचा प्रियकर', 'काय रे रास्कला' अशा चित्रपटात दिसली होती.

भाग्यश्रीने तेलगू चित्रपट 'चिकती गदीलो चिताकोटुडू' या चित्रपटातून दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही पदार्पण केले आहे. यात तिने आपल्या मादक अदांचा जलवा दाखवला होता.

भाग्यश्री मोटे लवकरच एका बॉलिवूड चित्रपटामधून लोकांसमोर येणार असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून आहे.

ट्रायअँगल प्रॉडक्शन निर्मित या चित्रपटाचे हार्दिक गज्जर दिग्दर्शन करणार आहेत. हा चित्रपट पुढील वर्षी रसिकांच्या भेटीला येणार आहे. 

टॅग्स :भाग्यश्री मोटेमलायका अरोरा