Join us
Daily Top 2Weekly Top 5

खबरदार! मराठीत का बोलत नाहीस, असं म्हणणाऱ्यांना करेन ब्लॉक, मराठी अभिनेत्याने दिली वॉर्निंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2020 11:09 IST

मराठी अभिनेत्याने नेटकऱ्यांना का दिली अशी वॉर्निंग, जाणून घ्या

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता गश्मीर महाजनी सध्या क्वारंटाईनमुळे आपल्या कुटुंबासोबत वेळ व्यतित करत आहे. नुकताच त्याने त्याच्या कुटुंबासोबतचा फोटो देखील इंस्टाग्रामवर शेअर केला होता. मात्र नुकतीच त्याने शेअर केलेली पोस्ट पाहून तो कुणावर तरी भडकल्याचे दिसतो आहे आणि इतकंच नाही तर त्याने नेटकऱ्यांना चेतावणीदेखील दिली आहे. 

गश्मीर महाजनीने इंस्टाग्रामवर घरातील वर्कआऊटचा व्हिडिओ शेअर केला आहे. मात्र हा व्हिडिओ शेअर करून त्याने म्हटलंय की, मराठी माणूस आहेस तर मराठीत का बोलत नाहीस अशी कमेंट केली तर ब्लाॅक करुन टाकीन. माझं मराठीपण सिद्धं करायला मला प्रत्येक वेळी मराठीतच बोलायची गरज नाही. एक्सरसाइज, रोगप्रतिकार शक्ती वाढवा. घरी रहा आणि सुरक्षित रहा.

अभिनेता गश्मीर महाजनीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर त्याने त्याच्या सिनेइंडस्ट्रीतील कारकीर्दीची सुरूवात 2010 साली मुस्कुराके देख जरा या चित्रपटातून केली आहे. मात्र या चित्रपटातून त्याला यश मिळाले नाही.

त्यानंतर त्याने 2015 साली कॅरी ऑन मराठा चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आणि चित्रपटसृष्टीत कमबॅक केले. याशिवाय देऊळबंद, कान्हा, वन वे तिकिट, मला काहीच प्रॉब्लेम नाही या चित्रपटात त्याने काम केले. या चित्रपटातून तो घराघरात लोकप्रिय झाला. 2017 साली रूबीक क्युब्स या हिंदी चित्रपटात काम केले.

2019 साली प्रदर्शित झालेला चित्रपट पानिपतमध्येही गश्मीरने काम केले. आता त्याचा बोनस हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत पूजा सावंत मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

 
टॅग्स :गश्मिर महाजनी