Join us

नाल्यातून एन्ट्री घेणार बँन्जो रितेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2016 13:25 IST

“प्रत्येक आनंदाची गोष्ट आपण बँन्जो कलाकारांच्या संगीतावर साजरी करतो पण अजून या कलेचा सन्मान केला जात नाही. हे खरंतर ...

“प्रत्येक आनंदाची गोष्ट आपण बँन्जो कलाकारांच्या संगीतावर साजरी करतो पण अजून या कलेचा सन्मान केला जात नाही. हे खरंतर खडतर काम आहे सकाळपासून मध्यरात्रीपर्यंत जराही आराम न करता हे कलाकार काम करत असतात. आम्हांला आमचा हिरो झोपडपट्टीत राहणारा बँन्जो कलाकार हवा होता. बहुतेकसे अभिनेते पडद्यावर बाईकवरुन, घोड्यावरुन एन्ट्री करतात पण माझा हिरो नाल्यातून एन्ट्री घेणार”, असं रवि जाधव सांगतो.

रितेश देशमुख आणि रवि जाधव यांच्या ‘बँन्जो’ या चित्रपटाची चर्चा तर सगळीकडेच होत आहे. रवि जाधव दिग्दर्शित पहिला हिंदी चित्रपट बँन्जोमध्ये रितेशची भूमिका ही त्याने आधी साकारलेल्या भूमिकेपेक्षा जरा वेगळी आहे. या भूमिकेसाठी त्याने खास मेहनत घेतली आहे. रितेश बँन्जोच्या सेटवर यायच्या अगोदर वाद्य शिकला होता.

“रिअल लोकेशन्सवर शुटिंग करण्यावर माझा विश्वास आहे. यामुळे चित्रपटाला खरेपणा येतो. रितेशला या चित्रपटाविषयी मी कल्पना दिली आणि शुटिंग बाबतीत त्याला काही अडचण नव्हती. संपूर्ण चित्रीकरण वरळी येथे करण्यात आलं असून २ तासात ते पूर्ण झालं. फायनल शॉटच्या वेळी विशेष काळजी घेण्यात आली. डॉक्टर्सपण त्यावेळी सेटवर हजर होते. रितेशने खरोखरंच या चित्रपटासाठी खास मेहनत घेतली आहे, असंही रवि जाधवने सांगितले.