सध्या अवघ्या तरुणाईमध्ये घंटा या चित्रपटाची चर्चा आहे. आजच्या तरुणाईवर भाष्य करणारा हा चित्रपट असल्याने तो तरुणांना खूप आवडेल असा विश्वास या चित्रपटाच्या निर्मात्यांना आहे. मुंबईत स्ट्रगल करणाऱ्या तिघांवर या चित्रपटाची कथा आहे. या चित्रपटाची निर्माती शैलेशा काळे आणि रोहित शेट्टी यांनी केली आहे. तर सुमित बोनकर आणि राहुल यशेद यांनी या चित्रपटाचं लेखन केले आहे. घंटा या चित्रपटामध्ये अमेय वाघ, सक्षम कुलकर्णी आणि आरोह वेलणकर हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. अमेय, सक्षम आणि आरोह यांनी केलेले स्ट्रगल पाहण्यासठी प्रेक्षकांना पाहण्यासाठी प्रेक्षकांना 14 आॅक्टोबरपर्यंतची वाट पाहावी लागणार आहे.
घंटा हा चित्रपट आॅक्टोबरमध्ये प्रदर्शित
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2016 16:00 IST