‘कच्चा लिंबू’च्या शूटिंगला सुरूवात
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2016 20:27 IST
अभिनेता प्रसाद ओक दिग्दर्शित आगामी ‘कच्चा लिंबू’ च्या चित्रीकरणाला नुकतीच गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर सुरूवात झाली असून सर्वांनाच या सिनेमाची प्रचंड ...
‘कच्चा लिंबू’च्या शूटिंगला सुरूवात
अभिनेता प्रसाद ओक दिग्दर्शित आगामी ‘कच्चा लिंबू’ च्या चित्रीकरणाला नुकतीच गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर सुरूवात झाली असून सर्वांनाच या सिनेमाची प्रचंड उत्सुकता आहे. प्रसाद ओक आता दिग्दर्शनात पदार्पण करीत आहे. ‘होणार सून मी’ फेम मंदार देवस्थळी हे या सिनेमाची निर्मिती करीत आहेत. पण महत्त्वाचे म्हणजे प्रसादचा ‘कच्चा लिंबू आहे, टिपी आणि बीपी फेम दिग्दर्शक रवी जाधव. काय? अहो समजलं नाही, म्हणता. या सिनेमाद्वारे रवी जाधव आता अभिनयात पदार्पण करीत आहे.