Join us

​प्रियांकाच्या मराठी चित्रपटातील बाप्पाचे गाणे प्रदर्शित !!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2016 15:52 IST

प्रियांका चोप्रा निर्मित पहिला मराठी चित्रपट ‘व्हेंटिलेटर’ मधील दोन गाणे गणेशोत्सवानिमित्त प्रदर्शित करण्यात आले आहेत

प्रियांका चोप्रा निर्मित पहिला मराठी चित्रपट ‘व्हेंटिलेटर’ मधील दोन गाणे गणेशोत्सवानिमित्त प्रदर्शित करण्यात आले आहेत. याबाबत स्वत: प्रियांकाने ट्विटरवरून माहिती दिली आहे. गणेशोत्सवानिमीत्त गाणी रिलीज करता आल्याचा आनंद असल्याचं प्रियंकाने म्हटलं आहे.}}}}‘व्हेंटिलेटरची’ या रे या सारे या आणि जय देवा ही दोन बाप्पाची जबरदस्त गाणी रिलीज झाली आहेत. गणेशोत्सवात या गाण्यांचा चांगलीच क्रेझ पाहायला मिळण्याची शक्यता आहे. प्रियंकाने ट्विटरवरुन याबद्दलची माहिती दिल्यानंतर ही गाणी मोठ्या प्रमाणात शेअर केली जात आहेत.या चित्रपटाचे दिग्दर्शन मधू म्हापूस्कर यांनी केलं आहे. चित्रपटाची निर्मिती प्रक्रिया सध्या शेवटच्या टप्प्यात असून तगडी स्टार कास्ट असणारा सिनेमा असल्याचं बोललं जातं.