"अभिनयाची मर्यादा ताणून बघण्यासाठी बालनाट्य"
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2016 10:42 IST
"कलावंताला आपल्या अभिनयाची क्षमता पारखून बघायची असेल तर बालनाट्य सारखा पर्याय नाही. अशा बालरंगभूमीचा प्रसार आणि प्रचार करण्याची आज ...
अभिनयाची मर्यादा ताणून बघण्यासाठी बालनाट्य
"कलावंताला आपल्या अभिनयाची क्षमता पारखून बघायची असेल तर बालनाट्य सारखा पर्याय नाही. अशा बालरंगभूमीचा प्रसार आणि प्रचार करण्याची आज गरज असून त्याकडे आता सेलिब्रिटीने काळजीपूर्वक वळण्याची गरज आहे. उर्मिला मातोंडकर, नाना पाटेकर, दिलीप प्रभावळकर, अतुल परचुरे, सुलभा देशपांडे यांच्या सारख्या दिग्गज कलावंतांची अभिनयाची कारकीर्द बालरंगभूमी पासूनच सुरु झाली आहे. पहिल्या अखिल भारतीय बालनाट्य संमेलनात बालरंगभूमीचे शिल्पकार म्हणून ज्यांचा गौरव करण्यात आला असे माझे वडील संजय पेंडसे यांची या क्षेत्रातील कारकीर्द मी जवळून पाहिली आहे, अनुभवली आहे. बालरंगभूमीचं महत्व जाणून या सदरीकणात मी पुढाकार घेतला आहे. 'अचाट गावची अफाट मावशी' हा त्यातीलच एक उपक्रम आहे." असे मत अभिनेत्री राधिका देशपांडे हिने व्यक्त केले. सुप्रसिद्ध साहित्यिक व नाटककार रत्नाकर मतकरी लिखित 'अचाट गावची अफाट मावशी' हे बालनाट्य १६ एप्रिल ते २३ एप्रिल दरम्यान पुण्यातील नाट्यगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. तसेच, अनेक वर्षानंतर या नाटकात सेलिब्रिटी फेस वापरण्यात आला आहे. "होणार सून मी ह्या घरची" मधील गीता म्हणजेच राधिका देशपांडे या नाटकात मुख्य नायिका असून, संजय पेंडसे या नाटकाचे दिग्दर्शक आहेत. दिलीप मुळे, नचिकेत म्हैसाळकर, शंतनू मंगरुळकर, मृणाल देसाई, अजिंक्य देव, वृषाली लोहोकरे, कुशल चीटणवीस, आरोही जोशी, करिष्मा भोरखडे, अभिलाष भुसारी व राधिका देशपांडे शिवाय बालकलावंत अंतरा देशपांडे, स्वरा ताम्हण, श्लोका राजे महाडिक व आरोही पाटील इत्यादी या नाटकामध्ये सहभागी होतील.