Join us

बापजन्म: बाप लेकाचे नाते उलगडणार सचिन खेडेकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2017 11:47 IST

मराठी रुपेरी पडदयावर विविध कथा संकल्पनेवर आधारीत चित्रपटांची निर्मिती होतेय.नवा आशय आणि नवा सिनेमा बापजन्म रसिकांच्या भेटीला येण्यास सज्ज ...

मराठी रुपेरी पडदयावर विविध कथा संकल्पनेवर आधारीत चित्रपटांची निर्मिती होतेय.नवा आशय आणि नवा सिनेमा बापजन्म रसिकांच्या भेटीला येण्यास सज्ज झाला आहे.‘मराठी कास्टिंग काऊच’ या वेबसिरीजच्या माध्यमातून निपुण धर्माधिकारी नावारूपाला आला. अत्यंत नाविन्यपूर्ण आणि वेगळ्या संकल्पनेच्या माध्यमातून निपूण युवकांमध्येही लोकप्रिय बनवला आहे. 'बापजन्म' या सिनेमाचे दिग्दर्शन निपुण धर्माधिकारीने  केले आहे. काही दिवसांपूर्वीच निपूणने सिनेमाची घोषणा केली आणि तेव्हापासून सिनेमा वेगवेगळ्या गोष्टींमुळे रसिकांमध्ये चर्चेचा विषय ठरू लागलाय. मुळात ‘बापजन्म’या आगळ्या वेगळ्या टायटलमुळे सिनेमा रसिकांना मनोरंजनासह एक विचार करायला भाग पाडणारा सिनेमा ठरणार असल्याचे बोलले जात आहे.या सिनेमाचे खास वैशिष्ट्य म्हणजे सिनेमात मुख्य भूमिकेत सचिन खेडेकर झळकणार आहेत.निपूणने सिनेमाचे पोस्टर त्याच्या फेसबुक पेजवर शेअर केले आहे.शेअर केलेल्या पोस्टरला ''बऱ्याच दिवसांनी आपल्यात संवाद होणार आहे आणि मी मनापासून बोलणार आहे. इतकंच म्हणेन की तुम्हीपण मनापासून ऐका!'' असे कॅप्शनही दिले आहे.सिनेमा रिलीज होण्याआधीच हटके प्रमोशनमुळं या सिनेमानं रसिकांमध्ये उत्कंठा निर्माण केलीय.‘बापजन्म’ १५ सप्टेंबरला रसिकांच्या भेटीला येणार असून आधीच्या सिनेमांप्रमाणेच हा सिनेमाही रसिक डोक्यावर घेतील अशी आशा व्यक्त केली जात आहे.सिनेमाच्या टायटलवरून बाप लेकाचे नाते सिनेमातून उलगडले जाणार अशा आशयाची कथा असल्याचे बोलले जात आहे.‘बापजन्म’ 'मी शिवाजीराजे भोसले बोलतोय', 'शिक्षणाच्या आयचा घो', 'हापूस', 'आयडीयाची कल्पना', 'तुकाराम', 'आजचा दिवस माझा', 'हॅप्पी जर्नी', 'कॉफी आणि बरेच काही', 'टाईम प्लीज', 'मुंबई-पुणे-मुंबई २' यांसारखे अनेक गाजलेले सिनेमा देणाऱ्या ‘एव्हरेस्ट एन्टरटेन्मेंट’ची प्रस्तुती आहे.