Join us
Daily Top 2Weekly Top 5

अक्षयनं रोखलं... सिद्धार्थला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2016 11:47 IST

अभिनेता सिद्धार्थ जाधव एका कॉमेडी कार्यक्रमात केलेल्या आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत आलाय. अभिनेत्री लिजा हेडन हिच्यावर 'वर्णभेदी' जोक्स मारल्याचा त्याच्यावर ...

अभिनेता सिद्धार्थ जाधव एका कॉमेडी कार्यक्रमात केलेल्या आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत आलाय. अभिनेत्री लिजा हेडन हिच्यावर 'वर्णभेदी' जोक्स मारल्याचा त्याच्यावर आरोप होतोय. 'हाऊसफुल ३'चं प्रमोशन                                  सिद्धार्थ नुकताच 'कॉमेडी नाईटस् बचाओ' या कार्यक्रमात सहभागी झाला होता. यावेळी, 'हाऊसफुल ३' या सिनेमाच्या प्रमोशनसाठी अक्षय कुमार, जॅकलिन फर्नांडिस आणि रितेश देशमुख, लिजा हेडन या ऑनस्क्रीन जोड्याही दाखल झाल्या होत्या.                       यावेळी, भारती सिंग आणि कृष्णा अभिषेक यांच्या नेहमीच्या स्टाईलनं कलाकारांवर कमेंट करून कॉमेडी करण्याचा प्रयत्न केला गेला. यावेळी, सिद्धार्थनं लिजा हेडन हिला 'कांगारू' असं संबोधलं. शिवाय तिला 'ब्लॅक आफ्रिकन'ही म्हटलं गेलं.