Join us

'जाणीव' हा समाजप्रबोधन करणारा लघुपट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2017 15:55 IST

  कथा-दिग्दर्शक विश्वास रांजणे यांनी शिक्षणाच्या साचेबद्ध चौकटीलाच छेद दिला आहे. ते दहावी नापास आहे. त्यांनी कलात्मकेचे कोणतेही अधिकृत शिक्षण ...

  कथा-दिग्दर्शक विश्वास रांजणे यांनी शिक्षणाच्या साचेबद्ध चौकटीलाच छेद दिला आहे. ते दहावी नापास आहे. त्यांनी कलात्मकेचे कोणतेही अधिकृत शिक्षण घेतलेले नाही. तरीही शिक्षणाचे महत्व अधोरेखित करणाºया ‘जाणीव’ या लघुपटाद्वारे त्यांनी समाजप्रबोधनाचा संदेश दिला आहे. विशेष म्हणजे, शासनाकडून हा लघुपट शाळांमध्ये दाखविण्याचा अध्यादेशही निघाला आहे.  आता ‘झेंडा स्वाभिमानाचा’ या चित्रपटामधून आरक्षणापेक्षा शिक्षणातून सक्षमीकरणाकडे वाटचाल करा, याची बीज समाजात रूजविण्याच्या दिशेने त्यांचा प्रवास सुरू झाला आहे. घरातूनच लोकपरंपरेचा वारसा मिळालेल्या विश्वास रांजणे यांनी सुरूवातीच्या काळामध्ये  ग्रामीण भागात भारूडाचे अनेक कार्यक्रम केले. रंगमंचावर भारूड सादर करण्याचा अनुभव असल्याने प्रायोगिक रंगभूमीवरही त्यांनी अभिनयाचा ठसा उमटविला. घरची परिस्थिती बेताची असल्याने लग्न झाल्यानंतर पत्नीला शिक्षण देण्यासाठी ते चित्र, म्युरल्स या कलात्मक निर्मितीकडे वळले. मात्र, कामानिमित्त दोघही घराबाहेर असल्यानं मुलाकडे दुर्लक्ष व्हायला लागल आणि त्याचा परिणाम मुलाच्या प्रगतीवर होऊ लागला. इथेच त्यांना ‘जाणीव’ या लघुपटाच्या कथेचे बीज गवसले.  कला दिग्दर्शनाचे कोणतेही प्रशिक्षण न घेता केवळ वरिष्ठांच्या कामाच्या निरीक्षणातून त्यांनी हे निर्मितीचे तंत्र आत्मसात केले हे त्यांच्या कामाचे आगळेवेगळे वैशिष्ट!  राज्य शासनाच्या शालेय शिक्षण क्रीडा विभागाकडून चार वर्षांपूर्वी हा लघुपट राज्यातील सर्व शाळांमधून दाखविण्यात यावा असा काढण्यात आलेला अध्यादेश ही जणू त्यांच्या कामाला मिळालेली पावती आहे. तसेच त्यांनी एवढ्यावरच न थांबता ‘शिक्षणा’चे महत्व तळागाळात रूजविण्यासाठी  ‘ झेंडा स्वाभिमानाचा’ हा चित्रपटदेखील निर्मित केला आहे. त्यांचा हा लघुपट नक्कीच समाज समाजप्रबोधन करण्यास हातभार लावेल यात शंका नाही.