लक्षाच्या मुलाचा अभिनय पाहण्यासाठी अवतरले सितारे
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2017 12:14 IST
लक्ष्मीकांत बेर्डे यांचा मुलगा अभिनय बेर्डे ती सध्या काय करते या चित्रपटातून प्रथम मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करीत आहे. प्रत्येक ...
लक्षाच्या मुलाचा अभिनय पाहण्यासाठी अवतरले सितारे
लक्ष्मीकांत बेर्डे यांचा मुलगा अभिनय बेर्डे ती सध्या काय करते या चित्रपटातून प्रथम मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करीत आहे. प्रत्येक आईवडिलांनाच आपल्या मुलांच्या कामाविषयी आत्मीयता असते. अशावेळी त्यांच्यासोबत उभे रहावे असे देखील वाटत असते. परंतू लाडक्या लेकाचा अभिनय पाहण्यासाठी आज लक्ष्मीकांत देखील नसतील तरी त्यांच्या जवळच्या मित्रांनी अभिनयला या क्षणी एकटे सोडलेले नाही. अनेक सिताºयांनी या चित्रपटाच्या प्रिमिअरला हजेरी लावली आणि अभिनयचे कौतुक देखील केले. लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या मित्र परिवारासाठी मुंबईत नुकतेच या सिनेमाचे स्पेशल स्क्रिनिंग ठेवण्यात आले होते. या स्क्रिनिंगला लक्ष्मीकांत यांचे मित्र जयवंत वाडकर, विजय कदम, पुरुषोत्तम बेर्डे यांच्यासह अनेकांनी हजेरी लावून अभिनयला या नवीन वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. जयवंत वाडकर यांनी अप्रतिमा सिनेमा असे म्हणून या सिनेमाचे कौतुक केले आहे. जॉनी लिव्हर यांचीही हजेरी यावेळी लक्षवेधी ठरली. या स्क्रिनिंगला बॉलिवूडचे प्रसिद्ध विनोदवीर जॉनी लिव्हर यांनीही विशेष हजेरी लावून लक्ष्याच्या मुलाला आशीर्वाद दिले. एवढेच नाही तर मराठी इंडस्ट्रीतील सेलिब्रिटींची उपस्थिती देखील पाहायला मिळाली. ती सध्या काय करतेय या सिनेमात अभिनय बेर्डे आणि सारेगमप लिटील चॅम्प्स फेम आर्या आंबेकर रुपेरी पडद्यावर पदार्पण करत आहेत. तर अंकुश चौधरी आण तेजश्री प्रधान हे कलाकार सिनेमात मुख्य भूमिकेत आहेत. सतीश राजवाडे दिग्दर्शित या सिनेमाच्या स्क्रिनिंगला अभिनयची आई प्रिया बेर्डे आणि धाकटी बहीण स्वानंदी यांनी हजेरी लावली होती. तर भरत जाधव त्यांच्या पत्नीसोबत पोहोचले होते. याशिवाय श्रेयस तळपदे आणि त्याची पत्नी दीप्ती, आदिनाथ कोठारे यांनीही हजेरी लावली होती.