Join us

प्रेक्षकांचा सूरज चव्हाणला 'गोलीगत धोका', 'झापुक झुपूक'ने पहिल्या आठवड्यात केली फक्त इतकी कमाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2025 14:39 IST

Suraj Chavan : बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनचा विजेता सूरज चव्हाणचा नुकताच 'झापुक झुपूक' सिनेमा प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे दिग्दर्शन केदार शिंदे यांनी केले आहे.

बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझन (Bigg Boss Marathi 5) चा विजेता सूरज चव्हाण(Suraj Chavan)चा नुकताच 'झापुक झुपूक' सिनेमा (Zapuk Zupuk Movie) प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे दिग्दर्शन केदार शिंदे यांनी केले आहे. या चित्रपटाची घोषणा झाली तेव्हापासून सूरजचे चाहते खूप उत्सुक होते. पण आता सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर त्याला हवा तितका प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसते आहे. पाच कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने आतापर्यंत एक कोटींची कमाई केली असली तरी अपेक्षेपेक्षा कमी असल्याचे दिसून येते. 

केदार शिंदे यांनी बिग बॉस मराठीच्या अंतिम सोहळ्यात सूरज चव्हाणवर सिनेमा बनवणार असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर झापुक झुपूक सिनेमा २५ एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटाने आतापर्यंत जवळपास १ कोटी २४ लाखांची कमाई केली आहे.

पहिल्या आठवड्याचं बॉक्स ऑफिस कलेक्शनझापुक झुपूक सिनेमाने पहिल्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी २४ लाखांची कमाई केली. त्यानंतर हे आकडे घसरताना दिसले. तिसऱ्या दिवशी १९ लाख, चौथ्या दिवशी १४ लाख, पाचव्या दिवशी १७ लाखांची कमाई केल्यानंतर प्रेक्षकांनी चित्रपटांकडे पाठ फिरवल्याचे चित्र पाहायला मिळाले. सहाव्या दिवशी ९ लाख आणि सातव्या दिवशी पाच लाखांची कमाई केली. सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, सूरज चव्हाणच्या या चित्रपटाने आतापर्यंत एकूण १ कोटी  २४ लाखांच्या जवळपास कमाई केली आहे. 

झापुक झुपूक सिनेमाबद्दलझापुक झुपूक सिनेमात सूरज चव्हाण शिवाय जुई भागवत, इंद्रनील कामत, हेमंत फरांदे, मिलिंद गवळी, पुष्कराज चिरपुटकर हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत.  

टॅग्स :केदार शिंदे