Join us

​अबब! भरत जाधवने घेतली १.१४ कोटीची ‘मर्सिडीज’ !!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2016 12:27 IST

बॉलिवूड स्टार्स त्यांच्या राहणीमानानूसार हव्या तशा महागड्या गाड्या घेतात. कारण त्यांची स्टॅँडर्ड आॅफ लिव्हिंग. त्यांच्या तुलनेने मराठी कलाकार हा ...

बॉलिवूड स्टार्स त्यांच्या राहणीमानानूसार हव्या तशा महागड्या गाड्या घेतात. कारण त्यांची स्टॅँडर्ड आॅफ लिव्हिंग. त्यांच्या तुलनेने मराठी कलाकार हा गरीब बिच्चारा समजला जातो. मात्र आता मराठी इंडस्ट्रीमधील कलाकार एक पाऊल पूढे जात नवनवीन व अलिशान महागड्या गाड्यांची खरेदी करु लागले आहेत. मराठी चित्रपट आणि नाटकातील सुपरस्टार असलेला अभिनेता भरत जाधव याने नुकतीच मर्सिडीज एस क्लास ही कार विकत घेतली. याची माहिती त्याने ट्विटरद्वारे दिली. आपल्या नवीन कारचा फोटो ट्विट करत त्याने म्हटले की, ‘बºयाच दिवसापासून मनात होत काल सत्यात अवतरलं. आपली नवी मर्सिडीज एस क्लास..!!’. मर्सिडीज एस क्लास या कारची किंमत १.१४ कोटींपासून सुरु होते. याव्यतिरीक्त मराठी कलाकारांमध्ये पहिली ‘व्हॅनिटी’ गाडी घेण्याचा मानही त्याच्या नावावर जमा आहे.