‘अॅट्रॉसिटी’ २३ फेब्रुवारीला होणार प्रदर्शित
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2018 16:13 IST
चित्रपट हा समाजमनाचा आरसा आहे. समाजात घडणाऱ्या घटनांचे प्रतिबिंब हे सिनेमात दिसत असतं. ‘अॅट्रॉसिटी’ कायद्याचं केवळ नावच अनेकांना माहिती ...
‘अॅट्रॉसिटी’ २३ फेब्रुवारीला होणार प्रदर्शित
चित्रपट हा समाजमनाचा आरसा आहे. समाजात घडणाऱ्या घटनांचे प्रतिबिंब हे सिनेमात दिसत असतं. ‘अॅट्रॉसिटी’ कायद्याचं केवळ नावच अनेकांना माहिती आहे. पण त्यात नेमकं काय आहे हे फार कमी लोकांना माहिती आहे. हाच वास्तववादी विषय प्रेक्षकांसमोर आणण्याचा प्रयत्न निर्माते डॉ राजेंद्र पडोळे आणि दिग्दर्शक दिपक कदम यांनी केला आहे. आर. पी प्रोडक्शनची प्रस्तुती असलेला ‘अॅट्रॉसिटी’ हा चित्रपट २३ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.कायदे बनतात आणि त्यातून बचावासाठी पळवाटाही काढल्या जातात, पण ज्यांच्यासाठी कायदे बनतात, त्यांना मात्र त्याबाबत फारशी माहिती नसते. ‘अॅट्रॉसिटी’ हा देखील एक असाच कायदा आहे, ज्याबाबत समाजात विशेष जागृती नाहीये. त्यामुळे समाजातील ज्या दुर्बल घटकांसाठी हा कायदा बनवण्यात आला ते याचा उपभोग घेऊ शकत नाही. अशा घटकांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी या उद्देशाने या कायद्यावर प्रकाशझोत टाकताना या कायद्याचा केला जाणारा दुरुपयोग यावर ‘अॅट्रॉसिटी’ चित्रपट भाष्य करणार आहे.‘अॅट्रॉसिटी’ मध्ये मांडण्यात आलेल्या वास्तववादी कथानकामध्ये मनोरंजक मूल्यांचा समावेश करीत गीत-संगीताची जोड देण्यात आली आहे. गीतकार अनंत जाधव, मंदार चोळकर, अखिल जोशी, विजय के. पाटील यांनी ‘अॅट्रॉसिटी’मधील गीतं लिहिली असून, संगीतकार अमर-रामलक्ष्मण यांनी त्यावर स्वरसाज चढवला आहे. आनंदी जोशी, वैशाली सामंत, जान्हवी प्रभू-अरोरा, शशिकांत मुंबारे, नंदेश उमप, सौरभ पी. श्रीवास्तव या गायकांनी या गीतरचना गायल्या आहेत. अनिल सुतार आणि जास्मिन ओझा यांनी गाण्यांची कोरिओग्राफी केली आहे.राजन सुर्वे आणि मंगेश केदार यांनी या चित्रपटाची पटकथा-संवाद लिहिले आहेत. यतिन कार्येकर, लेखा राणे, गणेश यादव, विजय कदम, सुरेखा कुडची, डॉ, निशिगंधा वाड, कमलेश सुर्वे या अनुभवी कलाकारांच्या जोडीला ऋषभ पडोळे आणि पूजा जैसवाल ही नवी जोडी या चित्रपटात असणार आहे. कॅमेरामन राजेश राठोड यांनी या चित्रपटाचं छायांकन केलं असून, मधू कांबळे यांनी कला दिग्दर्शन केलं आहे.Also Read : ‘अॅट्रॉसिटी’ने जमवली पूजा-ऋषभची जोडी