Join us

अथर्व बेडेकर, शुभम कदम आणि मृणाल जाधव झळकणार 'अंड्या चा फंडा'मध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2017 17:19 IST

दोन मित्र आणि त्यांची मैत्री यावर आधारित अनेक चित्रपट आजवर आपल्याला पाहायला मिळाले आहेत. याच मैत्रीच्या विषयावर भाष्य करणाऱ्या ...

दोन मित्र आणि त्यांची मैत्री यावर आधारित अनेक चित्रपट आजवर आपल्याला पाहायला मिळाले आहेत. याच मैत्रीच्या विषयावर भाष्य करणाऱ्या सिनेमांत 'अंड्या चा फंडा' या आगामी चित्रपटाचादेखील समावेश होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन संतोष शेट्टी यांचे आहे. तसेच या चित्रपटाची कथा देखील त्यांनी लिहिली आहे. बालपणाच्या मैत्रीवर आधारित असलेल्या या सिनेमाचे पोस्टर पाहिले असता हा सिनेमा नक्कीच धमाल आहे, हे लक्षात येत आहे. या पोस्टरमधील अंडया आणि फंड्याच्या भूमिकेमध्ये अथर्व बेडेकर आणि शुभम कदम हे दोन बालकलाकार आपल्याला पाहायला मिळणार आहेत.अथर्वने यापूर्वी 'माय डियर देश', 'असा मी अशी ती', 'पोर बाजार' यांसारख्या चित्रपटात काम केले असून शुभमने 'रईस' या बॉलिवूड चित्रपटात काम केले आहे. तसेच या चित्रपटात मृणाल जाधवदेखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. मृणालने 'लय भारी', 'तू ही रे' तसेच हिंदीतील 'दृश्यम' या चित्रपटात काम केले होते. ही चिमुरडी 'अंड्या चा फंडा' मध्ये आपल्या अभिनयाने कमाल करणार आहे.दिग्दर्शक संतोष शेट्टी यांनी अनेक वर्ष सीआयडी आणि आहट यांसारख्या मालिकांचे लिखाण आणि दिग्दर्शन केले असून, या सिनेमाच्या माध्यमातून ते प्रथमच मराठी चित्रपटांचे दिग्दर्शन करणार आहेत. चित्रपटात शेवटपर्यंत सस्पेन्स ठेवणे आणि प्रेक्षकांना विचार करायला लावणे हा त्यांचा हातखंडा आहे. या चित्रपटातदेखील त्यांची हीच शैली आपल्याला पाहायला मिळणार आहे. तसेच अंबर हडप, गणेश पंडित आणि श्रीपाद जोशी या त्रिकूटाने मिळून सिनेमाची पटकथा आणि संवादाची धुरा सांभाळलेली आहे.