Join us

आवडती भाजी, आवडता नेता, टॅटू अन् क्रश...!  चाहत्यांचा प्रश्नांना तेजस्विनीनं दिलं उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2022 16:56 IST

Tejaswini Pandit : अगदी राजकारणापासून, लग्नापूर्वी पत्रिका बघावी का? इथपर्यंतचे अनेक भन्नाट प्रश्नं चाहत्यांनी तेजस्विनीला विचारले. या प्रश्नांना तेजस्विनीने अगदी दिलखुलासपणे उत्तर दिलीत

सिनेमा, रंगभूमी आणि छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी तेजस्विनी पंडित (Tejaswini Pandit) सोशल मीडियावर किती अ‍ॅक्टिव्ह आहे, हे वेगळं सांगायला नको. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती आपल्या चाहत्यांसोबत संवाद साधत असते. शिवाय आपले फोटो आणि व्हिडीओसुद्धा ती फॅन्सबरोबर शेअर करत असते. नुकतंच  तेजस्विनीने इन्स्टाग्रामवर चाहत्यांसाठी खास ‘Ask me a  Question’ सेशन ठेवलं. मग काय, चाहत्यांनी तेजस्विनीवर प्रश्नांचा अक्षरश: भडीमार केला. या प्रश्नांना तेजस्विनीने अगदी दिलखुलासपणे उत्तर दिलीत. अगदी राजकारणापासून, लग्नापूर्वी पत्रिका बघावी का? इथपर्यंतचे अनेक भन्नाट प्रश्नं चाहत्यांनी तेजस्विनीला विचारले. 

तुझ्या शरीरावर किती टॅटू आहेत? असा प्रश्न एका चाहत्याने केला. यावर 4 असं उत्तर तेजस्विनीने दिलं. शिवाय पाचवा काढण्याचा विचार सुरू असल्याचंही तिनं सांगितलं. एका युजरने तेजस्विनीला तिच्या निकनेमबाबत प्रश्न केला. तुझं टोपण नाव काय, असा सवाल या युजरने केला. यावर छोटू, मनू, बंड्या, तेजू, मख्खन अशी टोपण नावांची यादीचं तेजूनं दिली.

लग्नापूर्वी पत्रिका बघावी की नाही? असा भन्नाट प्रश्न एका चाहत्याने केला. यावर लव्ह मॅरेज असेल तर नाही आणि अरेंज मॅरेज असेल तर तुमची मर्जी, असं उत्तर तेजस्विनीनं दिलं.

तुझ्यासारखी गुण गर्लफ्रेन्ड मला कशी मिळेल? असा सवालही एका चाहत्याने केला. यावर, ऊप्स, वो तो होने से रहा... कारण मी प्रत्येक बाबतीत दुर्मिळ आहे, असं धम्माल उत्तर तेजस्विनीने दिलं. तुम्हाला काही गिफ्ट दिलं तर स्वीकाराल का? यावर नेकी और पूछ पूछ, असं तेजू म्हणाली. 2022 वर्षासाठी काय संकल्प केला.- गेल्यावर्षीचा संकल्प पूर्ण करण्याचा...  

ताई, नोज पिन घाल ना, खूप क्यूट दिसतेस...- विश्वास ठेव, मला नाक टोचायचं आहे. पण आई मला बाहेर काढेल तसं केलं तर...

तुझ्या यशाचं रहस्य काय?शॉर्टकर्ट्स नाही... लंबी रेस का घोडा बनो..

कॉफी प्यायला कधी जायचं? - नको बाबा... कटिंग पिऊया...

तुझ्या आवडत्या भाज्या कोणत्या?मेथी, गवार, भेंडी.. पण मी सगळ्या भाज्या खाते..

तुझा क्रश कोण?याच्या उत्तरात तेजस्विनीने बॉलिवूड स्टार रणदीप हुड्डाचा फोटो शेअर केला आहे.

आवडता राजकीय नेता?- ब्रेन-शरद पवारजीजिद्द आणि जज्बा- स्वर्गीय श्री बाळासाहेबांचास्पष्टवक्तेपणा- नितीन गडकरी सरांचा... याचं मिश्रण असलेला नेता...

टॅग्स :तेजस्विनी पंडित