अश्विनी भावेला अशी ही बनवा बनवी या चित्रपटातील आठवला हा सीन... तुम्ही देखील हा सीन जरूर पाहा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2017 11:44 IST
अश्विनी भावेने अशी ही बनवा बनवी या चित्रपटातील एक सीन नुकताच शेअर केला असून या सीनला सोशल मीडियावर खूपच चांगला प्रतिसाद मिळत आहे.
अश्विनी भावेला अशी ही बनवा बनवी या चित्रपटातील आठवला हा सीन... तुम्ही देखील हा सीन जरूर पाहा
अश्विनी भावेने तिच्या चाहत्यांसोबत असलेले अंतर कमी करण्यासाठी नुकतीच www.ashvinibhave.com ही वेबसाईट लाँच केली आहे. ही वेबसाईट सुरू झाल्यानंतर अश्विनीने तिच्या फॅन्सना एक खूप छान गिफ्ट दिले आहे. अशी हा बनवा बनवी हा तिच्या कारकिर्दीतील एक खूपच चांगला चित्रपट आहे. या चित्रपटातील अश्विनी आणि अशोक सराफ यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडली होती. या चित्रपटातील अश्विनी भावे यांनी लिंबू कलरची साडी घातली असल्याचा सीन प्रचंड गाजला होता. हाच सीन त्यांनी त्यांच्या सोशल नेटवर्किंगला पोस्ट केला असून या सीनला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. या व्हिडिओला आजपर्यंत १२ हजाराहून अधिक लोकांनी पाहिले आहे. लिंबू कलरची साडी... २९ वर्षं झाली तरी अजूनही रंग फिका पडला नाही असे कॅप्शन अश्विनी भावेने या व्हिडिओसोबत लिहिले आहे. अश्विनी भावे यांच्या वेबसाईटचे आकर्षण म्हणजे अश्विनीचे एक्सक्लुसिव्ह असे फोटोज तिच्या फॅन्सना या वेबसाईटमध्ये पाहायला मिळत आहेत. तसेच अश्विनीबद्दल सर्वच माहिती तिच्या या वेबसाईटवर अगदी सहजरित्या मिळत आहे. फक्त चित्रपटच नाही, तर तिची संपूर्ण कारकीर्द त्यांना जवळून अनुभवता येत आहे. या वेबसाईटद्वारे तिच्या फॅन्सना तिच्या संपूर्ण आयुष्याचा प्रवास कळत आहे. किशोर वयापासून ते आतापर्यंत तिच्या आयुष्यात घडलेल्या सर्वच गोष्टींची यात नोंद आहे. तिचे सिनेसृष्टीतील पदार्पण आणि अमेरिकेतील स्थलांतर याबद्दल सारे काही या वेबसाईटवर वाचायला मिळत आहे. तिने केलेले चित्रपट, भूमिका आणि त्यातील छायाचित्र या सगळ्याचा त्यात समावेश आहे. तिने वेबसाईटमध्ये चार वेगळ्या कथांचा देखील समावेश करण्यात आला आहे. त्यात तिने 'हळद रुसली कुंकू हसलं' या चित्रपटादरम्यान झालेले किस्से मांडले आहेत. सोबतच त्यात तिच्या 'राजा संन्यास' या नाटकात आणि ‘आर के स्टुडिओ’ मध्ये अनुभलेल्या प्रसंगातून मिळालेली शिकवण याची देखील नोंद केली आहे. हे सर्व वेबसाईटच्या पेज वरील फिल्मी स्टोरीस यात पाहायला आणि वाचायला मिळत आहे. तिचे अनेक ब्लॉग्स आणि तिच्या दैनंदिन जीवनाचे वर्णन ती या वेबसाईटद्वारे करत आहे आणि या सगळ्या घडामोडी ती रोज अपडेट करत आहे.Also Read : अश्विनी भावे अमेरिकेत मिस करते भारतीय जेवण