Join us
Daily Top 2Weekly Top 5

आशुतोष गोवारीकर यांना लोकमत महाराष्ट्रीय आॅफ द इयर पुरस्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2017 20:51 IST

दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांच्यातील सिनेमा क्षेत्रातील पुरुष कॅटेगरीतील लोकमत महाराष्ट्रीय आॅफ द इयर पुरस्कारांने गौरविण्यात आले. अभिनेत्री सई ताम्हणकर, ...

दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांच्यातील सिनेमा क्षेत्रातील पुरुष कॅटेगरीतील लोकमत महाराष्ट्रीय आॅफ द इयर पुरस्कारांने गौरविण्यात आले. अभिनेत्री सई ताम्हणकर, गजेन्द्र चौहान यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. बॉलिवूडला आॅस्करपर्यंत नेणारे आणि वैविध्यपूर्ण विषय घेऊन सिनेमा बनवणारे दिग्दर्शक म्हणजे आशुतोष गोवारीकर. त्यांच्या ‘लगान’ या सिनेमाने आॅस्करपर्यंत झेप घेत नवा इतिहास निर्माण केला होता. त्यानंतर ‘स्वदेस’, ‘जोधा अकबर’, ‘मोहेंजोदडो’ अशा दर्जेदार सिनेमांची आशुतोष गोवारीकर यांनी निर्मिती केली. नुकतंच ब-याच वर्षांनंतर अभिनयाच्या क्षेत्रातही आशुतोष गोवारीकर यांनी कमबॅक केलं आहे. आपल्या दमदार आणि सशक्त अभिनयाने आशुतोष गोवारीकर यांनी ‘व्हेंटिलेटर’ या सिनेमातील भूमिका साकारली. दिग्दर्शनाकडे वळल्यानंतर त्यांच्यातला अभिनेता काहीसा दूर गेला होता. मात्र इतक्या वषार्नंतरही त्यांच्यातली अभिनयाचे गुण कायम असल्याचे ‘व्हेंटिलेटर’ सिनेमातील भूमिकेने सिद्ध केले. एक प्रतिभावंत दिग्दर्शक असण्यासोबतच अभिनय कौशल्यातही दमदार असल्याचे आशुतोष गोवारीकर यांनी दाखवून दिले आहे. त्यांच्यातील याच चतुरस्त्र कौशल्यक्षमतेचा गौरव सिनेमा क्षेत्रातील पुरुष कॅटेगरीतील लोकमत महाराष्ट्रीय आॅफ द इयर पुरस्कारांने करण्यात आला.