Join us
Daily Top 2Weekly Top 5

बॉलिवूड नव्हे तर 'या' मराठी चित्रपटासाठी आशा भोसलेंनी गायलेले पहिले गाणे, तुम्ही ऐकलंय का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2026 16:27 IST

बॉलिवूड नव्हे तर 'या' मराठी चित्रपटासाठी आशा भोसलेंनी दिलेला पहिल्यांदा आवाज, वयाच्या १० व्या वर्षी इंडस्ट्रीत रोवले पाय

Asha Bhosle Frist Song: आपल्या चिरतरुण आवाजाने संपूर्ण जगाला भुरळ घालणाऱ्या पार्श्वगायिका आशा भोसले यांचे आज दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने भारतीय संगीत क्षेत्रातील एक महान गायिका हरपली आहे. मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हृदयविकाराचा झटका आल्यामुळे ११ एप्रिल २०२६ रोजी त्यांना मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.मात्र उपचारादरम्यान अवयव निकामी होत गेल्याने, आज १२ एप्रिल २०२६ ला सकाळी त्यांनी चित्रपटसंगीताला पोरके करत या जगाला अलविदा म्हटलं. प्रचंड कष्ट, धडपड, जुने सहकारी यांना न विसरणाऱ्या, किंबहुना आवर्जून लक्षात ठेवणाऱ्या आशाताई ह्या एक ‘संवेदनशील माणूस’ म्हणूनही प्रसिध्द होत्या.वयाच्या ८० तही आशा भोसले या मंचावर एक ‘उत्कृष्ट परफॉर्मर’ म्हणून रसिकांसमोर येत असत. 

हिंदी आणि मराठीसह तब्बल २० हून अधिक भाषांमध्ये हजारो गाणी गाणाऱ्या आशाताईंचा जन्म ८ सप्टेंबर १९३३ रोजी सांगली येथे झाला. त्यांचे वडील प्रसिद्ध शास्त्रीय गायक आणि नाट्यसंगीतकार पंडित दीनानाथ मंगेशकर होते. मास्टर दीनानाथांचा गाण्याचा वारसा मिळाला. भारतरत्न लता मंगेशकर या त्यांच्या थोरल्या बहीण होत्या. तसेच मीना खडीकर, उषा मंगेशकर आणि हृदयनाथ मंगेशकर या भावंडासमवेत त्यांनीही संगीत साधनेला आयुष्य अर्पण केले होते.  या मराठी चित्रपटासाठी केलेलं पहिल्यांदा गायन

आशा भोसले यांनी वयाच्या १० व्या वर्षी (१९४३ मध्ये) 'माझा बाळ' या मराठी चित्रपटातून गायनाला सुरुवात केली. 'चला चला नव बाळा' हे गाणे त्यांनी पहिल्यांदा गायलं. त्या वेळी आशा भोसले अवघ्या १० वर्षांच्या होत्या.  या गाण्याने त्यांच्या सुवर्ण कारकीर्दीची सुरुवात झाली, जी पुढे अनेक दशके चालू राहिली. त्यानंतर हिंदीबरोबर आशा भोसलेंची मराठी गाण्यांची कारकीर्द बहरतच गेली.  

एका मुलाखतीत आशा भोसले यांनी त्यांच्या पहिल्या गाण्याचं रेकॉर्डिंग कसं झालं होतं, याच्या आठवणी शेअर केल्या होत्या. त्यावेळी त्यांचे हातापाय अक्षरश थरथरत होते, ती आठवण सांगत आशाजी म्हणालेल्या, "जेव्हा मी माझे पहिले गाणे रेकॉर्ड केले, तेव्हा मी अवघ्या १० वर्षांची होते. मला हे गाणे 'माइक'समोर उभे राहून गायचे होते आणि त्यावेळी मी थरथरत होते; कारण तेव्हा मला कशाचीच काहीही माहिती नव्हती. माझ्या वडिलांनी त्यांची गाणी रेकॉर्ड केली होती. त्यानंतर, जेव्हा मी ते पहिले गाणे गायले, तेव्हा मला जाणीव झाली की, मी सुद्धा गाऊ शकते. 'दीदी'च केवळ गाते असे नाही, तर मी सुद्धा गाऊ शकते." अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या होत्या.

English
हिंदी सारांश
Web Title : Asha Bhosle's first song was for Marathi film, not Bollywood.

Web Summary : Asha Bhosle debuted at age 10 with "Chala Chala Nav Bala" in the Marathi film 'Majha Bal'. This marked the start of her career. She recalled being nervous during the recording but realized her singing potential.
टॅग्स :आशा भोसलेमराठी चित्रपटमराठी गाणी