Join us
Daily Top 2Weekly Top 5

आर्याला विदया प्रज्ञा पुरस्कार जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2016 14:11 IST

 आपल्या आवाजाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारी लाडकी गायिका आर्या आंबेकर हिला नुकताच विदया प्रज्ञा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. हा ...

 आपल्या आवाजाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारी लाडकी गायिका आर्या आंबेकर हिला नुकताच विदया प्रज्ञा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. हा पुरस्कार साहित्य, चित्रपट आणि कलाक्षेत्रात अत्यंत प्रतिष्ठतेचा समजला जाणारा हा पुरस्कार आहे. गेल्या चार वर्षापासून गदिमा प्रतिष्ठानने सुरू केलेला हा पुरस्कार आहे. गदिमांच्या पत्नी विदयाताई यांच्या नावाने दिला जाणारा हा पुरस्कार आहे. नवीन उभारत्या स्त्री कलाकाराला प्रोत्साहन देण्यासाठी हा पुरस्कार दिला जातो. या पुरस्काराविषयी लोकमत सीएनएक्सला आर्या सांगते, या पुरस्कारासाठी माझी निवड केल्याने खूप आनंद झाला आहे. कारण एवढया मोठया कवीच्या नावाने मिळणारा हा पुरस्कार आहे. सर्वात पहिले मला या पुरस्कारासाठी निवड झाल्याचा फोन आला होता. सुरूवातीला मला खर वाटलं नाही. कोणीतरी गंमत करत आहे असे वाटले. पण त्यानंतर पटवून दिल्यानंतर, मी स्वत: खूप सरप्राईज झाले होते. मात्र या पुरस्काराने प्रोत्साहन तर मिळालेच. त्याचबरोबर एक जबाबदारीदेखील वाढली आहे. पण त्यामुळे भविष्यात आपली कला सादर करण्याचा आत्मविश्वासदेखील वाढला आहे. यापूर्वी हा पुरस्कार मधुरा दातार, विभावरी जोशी, उर्मिला धनगर, बेला शेंडे यांना प्राप्त झाला होता. आर्या ही सारेगमप लिटिल चॅम्पस या कार्यक्रमाच्या माध्यमातून  प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. तिने गो बॅक, रमामाधव, योध्दा, रेडीमिक्स अशा अनेक चित्रपटांसाठी गायिली आहे. तसेच तिचा दिवा लागू दे रे देवा हा सोलोअल्बमदेखील तिने केला आहे. आता ती, गायनासोबतच अभिनय करतानादेखील प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. तिचा ती सध्या काय करते हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. तिच्या या पहिल्या चित्रपटात तिच्यासोबत अभिनय बेर्डे पाहायला मिळणार आहे.