Join us

लग्नाबद्दल आर्या आंबेकर पहिल्यांदाच स्पष्टच बोलली, म्हणाली- 'माझा लग्नाचा...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2023 18:45 IST

Arya Ambekar : गायिका आणि अभिनेत्री आर्या आंबेकर लवकरच लग्न करणार असल्याची चर्चा सध्या रंगली आहे.

मागील काही दिवसांपासून सिनेइंडस्ट्रीत लग्नाचे वारे वाहत आहेत. अनेक बॉलिवूड कलाकार विवाहबंधनात अडकताना दिसत आहे. बॉलिवूड कलाकारांप्रमाणे अनेक मराठी कलाकारही विवाह बंधनात अडकत असल्याचे पाहायला मिळत आहे. मराठी सिनेइंडस्ट्रीतील गायिका आणि अभिनेत्री आर्या आंबेकर (Aarya Ambekar) लवकरच लग्न करणार असल्याची चर्चा सध्या रंगली आहे. नुकतेच तिने यावर मौन सोडले आहे.

आर्या आंबेकर ही झी मराठीवरील ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ या रिअ‍ॅलिटी शोमधून प्रसिद्धीझोतात आली. आर्या आंबेकरने गायन क्षेत्राप्रमाणेच आर्याने अभिनयातही नशीब आजमावले. तिथेही तिला यश मिळाले. आज तिचा मोठा फॅन फॉलोव्हिंग आहे. नुकतेच एका मुलाखतीत आर्याला तिच्या लग्नाबद्दल विचारण्यात आले. त्यावर तिने फारच मजेशीर उत्तर दिले.

आर्या आंबेकर म्हणाली की, मी यावर्षी लग्न करत नाही. या सर्व मागची मोठी गुन्हेगार व्यक्ती म्हणजे कार्तिकी गायकवाड. आमच्या पाच लिटिल चॅम्प्सपैकी कार्तिकी गायकवाड जिने विवाह केला. तिने लग्न केल्यामुळे आता सर्वजण तू लग्न कर, तू लग्न कर म्हणून माझ्या मागे लागलेत. त्यांना माझ्याबद्दल काहीही कळत नाही, म्हणून ते अशा अफवा पसरवतात. माझा लग्नाचा वगैरे आता काहीही विचार नाही, असे आर्याने म्हटले.

आर्या आंबेकरने आतापर्यंत अनेक मराठी आणि हिंदी भाषेतील अल्बम्समध्ये गाणी गायली आहे. त्याबरोबर तिने काही मराठी चित्रपटांसाठी आणि नाटकांसाठी गाणी गायली आहेत. आर्याच्या सौंदर्याने देखील अनेकांना भुरळ घातली आहे. २०१७ सालामध्ये आलेल्या ‘ती सध्या काय करते’ या चित्रपटातून तिने अभिनय कारकिर्दीतून सुरुवात केली.

टॅग्स :आर्या आंबेकर